चित्रपटाऐवजी सासरचं नातं जपलंय मी,भाग्यश्रीचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Bhagyashree reveals that her filmy life changed after marriage

चित्रपटाऐवजी सासरचं नातं जपलंय मी,भाग्यश्रीचा मोठा खुलासा

भाग्यश्रीच्या सौदर्यानं कोणीही भारून जाईल एवढी सुंदर ही अभिनेत्री एवढा काळ चित्रपटांच्या दूर पडद्याआड असण्याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.भाग्यश्रीच्या पहिल्याच चित्रपटातून तीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.तीच्या त्या पहिल्या चित्रपटाचं एखादं गाणं जरी कानावर पडलं तरी भाग्यश्रीची प्रेक्षकांना आजही आठवण येते.मैने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्रीने प्रेक्षकांची मनं इतपत जिंकून घेतली होती की प्रेक्षकांना भाग्यश्री पुढील चित्रपटांत अपेक्षित होती.पण मात्र भाग्यश्रीचे लग्न झाले आणि तीचे संपूर्ण जीवनच बदलले.

एका मुलाखतीत बोलताना भाग्यश्री म्हणाली,माझं लग्न अशा घरात झालं ज्यांचा चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता.लग्न झाल्यानंतर मी सिनेमातली भाग्यश्री न राहता एका गृहिणीला जी कामं करावी लागतात,जसे सगळे सांभाळावे लागते तसेच माझेही आयुष्य झाले.अक्षरश: माझ्या घरच्यांना मी माझ्या चित्रपटातील जीवनाचे महत्व कधी समजवूच शकले नाही.त्यामुळे माझा सिनेसृष्टीतील वावर कमी होत गेला.तसेच भाग्यश्रीने बोलताना हे देखिल उघड केले की,तीच्या नवऱ्याला मी त्याला सोडून कोणाबरोबर रोमँटिक सिन्स करावे हेदेखिल पसंत नव्हते.त्यामुळे मग मी चित्रपट सोडून त्याच्या आणि माझ्या नात्याला महत्व दिले.

बऱ्याच काळानंतर आता मात्र भाग्यश्री सोशल मीडियावर अॅक्टिव दिसून येते.कंगनासोबत एका वेब सिरीजमधे अभिनय करताना सुद्धा ती दिसते.भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका या दोघांनीही तिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय विश्वात प्रवेश केला आहे.अभिमन्यू अखेरचा मीनाक्षी सुंदरेश्वरमध्ये सान्या मल्होत्रासोबत दिसला होता.

Web Title: Actress Bhagyashree Reveals That Her Filmy Life Changed After

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top