esakal | अखेर बेड मिळाला..,भूमीने मानले नेटकऱ्यांचे आभार

बोलून बातमी शोधा

actress bhumi pednekar
अखेर बेड मिळाला..,भूमीने मानले नेटकऱ्यांचे आभार
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई - कोरोना रूग्णांची संख्य़ा झपाट्याने वाढत आहे. अनेक रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णांना वेळेवर उपचार होत नाही. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकरला देखील तिच्या मावशीच्या उपचारासाठी रूग्णालयामध्ये व्हेंटिेलेटर बेड पाहिजे होता. त्या संदर्भात भूमीने ट्विटरवर एक ट्विट केले .या ट्विटमध्ये भूमीने लिहिले होते, ‘ हा काळ दिवसेंदिवस कठीण होत आहे. मला दिल्ली एनसीआरमध्ये माझ्या मावशीसाठी व्हेंटिलेटर बेड पाहिजे. ती आयसीयूमध्ये आहे . आम्हाला त्वरित तिची बदली करायची गरज आहे.

भूमीनं आपल्या सोशल मी़डियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर कोणाला काही माहित असेल तर कृपया मला मेसेज करा’ भूमीचे हे ट्विट अनेक नेटकऱ्यांनी पाहिले. अनेकांनी भूमीच्या ट्विटला रिप्लाय करत बेड उपलब्ध असलेल्या रूग्णालयांची नावे सांगितली.त्यामुळे ट्विट पोस्ट झाल्यानंतर काही क्षणातच भूमीला तिच्या मावशीसाठी रूग्णालयात बेड मिळाला. ट्विटरवरील भूमीच्या एका चाहत्याने तिला बेड मिळण्यास मदत केली. त्यानंतर भूमीने ट्विट केले, ‘माझ्यासाठी प्रार्थना करणा-या चाहत्य़ांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. माझ्या मावशीला मदत मिळाली. मला मेसेज करुन माहिती दिलेल्या प्रत्येकाचे आभार.

img

bhumi pednekar

गेल्या ३ आठवड्यात घडलेल्या सर्व गोष्टींनी भारावून गेली आहे. आपण पुन्हा एकदा लोकांना मदत करायला सुरु करुया. हे ट्विट करून भूमीने नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे भूमीच्या मावशीला बेड मिळाला. अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांबरोबरच इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना देखील उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. दिवसेंदिवस रूग्णालयातील या कठीण परिस्थितीबद्दल भूमीने सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. एप्रिल महिन्यामध्ये भूमीला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा ती होम क्वारंटाइन होती. दोन आठवड्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

हेही वाचा: दीपिका पदुकोणचे वडील रुग्णालयात दाखल; आई आणि बहीणसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह

हेही वाचा: 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीच्या २९ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन