Video : ऑस्कर विजेत्यानं ट्रॉफी ठेवली खुर्ची खाली; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

पुरस्काराचे वितरण होत असतानाच एक हास्यास्पद घटना घडली आहे. उत्कृष्ट आधारित पटकथा हा पुरस्कार जोजो रॅबिट या चित्रपटासाठी लेखक टायका वैयतिटी यांना मिळाला आणि त्यांनी त्यांची ऑस्कर ट्रॉफी ही समोर बसलेल्या व्यक्तीच्या सीटखाली ठेवली.

लॉस एंजिल्स : जगातील सर्व चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण समारंभ रविवारी (ता. ९) रात्री मोठ्या दिमाखात पार पडला. पण, पुरस्काराचे वितरण होत असतानाच एक हास्यास्पद घटना घडली आहे. उत्कृष्ट आधारित पटकथा हा पुरस्कार जोजो रॅबिट या चित्रपटासाठी फिल्ममेकर टायका वैयतिटी यांना मिळाला आणि त्यांनी त्यांची ऑस्कर ट्रॉफी ही समोर बसलेल्या व्यक्तीच्या सीटखाली ठेवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

४४ वर्षीय पटकथाकार टायका वैयतिटी यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर समोर बसलेल्या अभिनेत्री ब्राय लार्सन हिच्या सीटखाली आपली ऑस्कर ट्रॉफी ठेवली. या व्हिडिओमध्ये टायका हे काळजीपूर्वक आपली ट्रॉफी सीटखाली ठेवताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केलेला पाहायला मिळत आहे.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

तत्पूर्वी, चित्रपट समीक्षकांचे दावे फोल ठरवीत दक्षिण कोरियाच्या पॅरासाइटने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवून इतिहास रचला. ऑस्करचे विजेतेपद मिळविणारा हा पहिलाच बिगरइंग्रजी चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या चार गटांमध्ये पॅरासाइटने बाजी मारली. जोकरचा नायक जोक्विन फिनिक्स हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्युडीतील रिनी झेलवेगरला हिची निवड झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Brie Larson catches filmmaker Taika Waititi hilariously stashing his Oscars trophy under the seat