लग्नासाठी बदलला धर्म, तरीही 'ही' अभिनेत्री अविवाहित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा ही होय. तिने   ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. नयनताराचा आज  वाढदिवस आहे.  

मुंबई : सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा ही होय. तिने   ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. नयनताराचा आज  वाढदिवस आहे.  

नयनताराने आतापर्यंत अनेक मल्याळम, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली आहे. नयनताराने २००३ मध्ये मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणती केली जाते.

नयनताराचे खरे नाव ‘डायना मरियम कुरिअन’ असे आहे. चित्रपटसृष्टीमधील नयनताराचा प्रवास अतिशय यशस्वी आणि खास होता. मात्र नयनताराला खासगी आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. एक काळ असा होता की नयनतारा आणि प्रभूदेवाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही काळानंतर ते दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचे समोर आले होते.

नयनतारा आणि प्रभूदेवाच्या अफेरच्या चर्चा सुरु असताना प्रभू देवा विवाहित असून त्याला तीन मुले होती. पण प्रेम हे अंधळं असतं हे त्या दोघांनी सिद्ध करुन दाखवले होते. नयनतारा आणि प्रभूदेवा लिवइन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले. प्रभूदेवाच्या पत्नीला या गोष्टीची भनक लागताच तिने २०१० मध्ये कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेतून प्रभूदेवा आणि नयनतारा लिवइनमध्ये राहत असल्याचा खुलासा झाला. प्रभूदेवाने नयनताराशी लग्न केले तर त्या उपोषण करतील अशी धमकी त्यांनी प्रभूदेवाला दिली. तेव्हा नयतराच्या विरोधात अनेक आंदोलन देखील झाली. त्यामुळे नयनतारा आणि प्रभूदेवाचे नाते आणखी घट्ट झाले.

प्रभूदेवा नयनताराच्या इतक्या प्रेमात होता की त्याने त्याचा १६ वर्षांचा संसार देखील मोडून २०११ मध्ये पत्नीला घटस्फोट दिला. तेव्हा त्याने पत्नीला १० लाख रुपये आणि मालमत्तेचा काही हिस्सा पोटगी म्हणून दिला होता. मात्र घटस्फोटानंतर काही दिवसांतच प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्यातील नात्याला देखील पूर्णविराम लागला. पण नयनताराने प्रेमा खातर धर्म देखील बदलला असल्याचे म्हटले जाते.

नयनतारा खरं तर जन्माने ख्रिश्चन होती पण प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठी तिने २०११ मध्ये हिंदू धर्म स्वीकारला असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आज वयाच्या ३५ व्या वर्षी देखील नयनतारा अविवाहित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this actress change her caste owing of love