Video : तीन महिन्याच्या बाळाला घेऊन 'या' अभिनेत्रीने सर केले शिखर

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नुकत्याच आई बनलेल्या या 35 वर्षांच्या समीराने इन्स्टाग्रामवर लेकीसोबत फोटो शेअर केले आहेत. समीरा तिच्या तीन महिनाच्या मुलीसह 'मदरहुड मुमेंट' एन्जोय करताना दिसली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. खूप वेळा ती स्वत: चे सुंदर फोटो अपलोड करताना दिसते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नुकत्याच आई बनलेल्या या 35 वर्षांच्या समीराने इन्स्टाग्रामवर लेकीसोबत फोटो शेअर केले आहेत. समीरा तिच्या तीन महिनाच्या मुलीसह 'मदरहुड मुमेंट' एन्जोय करताना दिसली.

समीरा वेकेशनसाठी कर्नाटकच्या  'मुलायनगिरी' या सर्वांत उंच शिखरावर गेली होती. विशेष म्हणजे ती एकटी गेली नसून तीन महिन्याची मुलगी 'नायरा' सह हे शिखर चढली. लेकीसोबत केलेल्या या ट्रेकिंगचा व्हिडीओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

त्याला कॅप्शन देताना तिने लिहिलं,'नायराला माझ्यासोबत घेऊन मी मुलायनगिरी चढण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये मला हा प्रवास थांबवावा लागला कारण, मला श्वास घेताना त्रास होऊ लागला. 6300 फिट उंच हे कर्नाटकातलं सर्वात उंच शिखर आहे.' लेकीसह हे शिखर चढून समीराने इतर महिलांसाठी नक्कीच एक आदर्श निर्माण केला आहे. त्याविषयी प्रेरणादायी असा संदेश तिने कॅपश्नमध्ये दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Welcome to my world !! . . @mommyshotsbyamrita #mua @perfektmakeover

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीरसह तिचा मोठा मुलगा हंस आणि पती अक्षय वरदेसह मुंबईपासून लांब कर्नाटकच्या चिकमगलुर इथे एन्जोय करताना दिसली. उद्योजक अक्षय वरदेसह 2013 मध्ये लग्नबंधनात अडकल्यावर ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेली आहे. ती याआधी दे दना दन, टॅक्सी नंबर 9211 आणि मेने दिल तुझको दिया या चित्रपटातून दिसली. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Date night much needed timeout #aboutlastnight #mybae

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this actress Climbed The Tallest Peak In Karnataka With Her 3 Month Old Daughter