esakal | हिरॉईन व्हायचयं तर, फातिमाचंही झालं होतं 'कास्टिंग काऊच'

बोलून बातमी शोधा

actress fatima sana shaikh
हिरॉईन व्हायचयं तर, फातिमाचंही झालं होतं 'कास्टिंग काऊच'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊचचा प्रकार काही नवीन नाही. यापूर्वी अनेक बॉलीवूडच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर कास्टिंग काऊचचा आरोप झाला आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. आता बॉलीवूडच्या आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीनं याबद्दल भाष्य केलं आहे. तुम्हाला अभिनेत्री तनुश्री दत्ताचे प्रकरण आठवत असेल, त्या प्रकरणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शेवटी तनुश्रीनं आपल्या बाजुनं कोणी उभं राहिलं नसल्याची खंतही व्यक्त केली होती. दंगल गर्ल फातिमा सना शेखनं आपल्याला आलेल्या एका अनुभवाविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

फातिमा आपल्या वादग्रस्त स्वभावामुळे बॉलीवूडमध्ये प्रसिध्द आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. परखड मतांबद्दल प्रसिध्द असणा-या फातिमाचा लुडो चित्रपटातील अभिनय सर्वांच्या पसंतीस पडला होता. आता तिनं आपल्याला आलेल्या कास्टिंग काऊच बद्दल धक्कादायक माहिती शेअर केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यात मोठी बातमी म्हणजे यापूर्वी फातिमानं आपण सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिच्या फॅन्सनं नाराजी व्यक्त केली होती. तिच्या आताच्या एका पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फातिमानं पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, एकदा मी रस्त्यानं चालले होते. त्यावेळी एक मुलगा माझ्याकडे टक लावून पाहत होता. मी त्याला म्हणाले तु असा मला का पाहतो आहे, तो म्हणाला माझी मर्जी. तुला मार खायचा आहे का असं मी त्याला म्हणाले, तो म्हणाला मार. त्य़ावेळी आमच्यातील वाद टोकाला गेला होता. आणि मी त्याला खरचं कानशीलात लगावली होती.

मी त्याला कानशीलात मारल्यानंतर त्यानं मला एक ठोसा लगावला. त्यानंतर मी माझ्या वडिलांना फोन केला होता. त्यांना काय झाले सांगितले होते. बाबा लगेच आले. त्यांच्यासोबत काही माणसेही होती. तो मुलगा पळून गेला होता. दंगल चित्रपटापूर्वी मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तुला जर चित्रपटात काम हवे असेल तर माझ्याकडे सेक्सची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट दुसरीकडे गेले होते. कारण त्यांच्याजवळ रेफरन्स होता.