esakal | 'क्या खूब लगती हो..'; पाहा जेनेलियाचा गुढीपाडवा स्पेशल VIDEO

बोलून बातमी शोधा

genelia rietesh deshmukh

व्हिडीओमध्ये जेनेलिया आणि रितेशने 'क्या खूब लगती हो' या गाण्यावर लिप्सिंग करत आहेत. यामधील रितेश आणि जेनेलियाच्या केमिस्ट्रिला  नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

'क्या खूब लगती हो..'; पाहा जेनेलियाचा गुढीपाडवा स्पेशल VIDEO
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- बॉलिवूडमध्ये क्युट कपल म्हणून प्रसिध्द असलेली जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. जेनेलिया सोशल मिडीयावर रितेश आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीयो  शेअर करते. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांच्या नेहमीच पसंत पडतात. अनेक नेटकरी या व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. काही दिवसांपूर्वी जेनेलिया स्केटिंग खेळताना पडली होती. यावेळी तिला हाताला फ्रॅक्चर झाले होते. हाताला दुखापत झाली असूनही जेनेलिया रितेशसोबत एका जाहिरातीच्या सेटवर पोहोचली. या शूटिंग दरम्यान मेक-अप करत असताना  जेनेलिया आणि रितेशने एक भन्नाट व्हिडीओ शूट केला. 

व्हिडीओमध्ये जेनेलिया आणि रितेशने 'क्या खूब लगती हो' या गाण्यावर लिप्सिंग करत आहेत. यामधील रितेश आणि जेनेलियाच्या केमिस्ट्रिला  नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. हा व्हिडीओ शेअर करून जेनेलियाने त्याला कॅप्शन दिले की, ' कठीण काळ हा त्या व्यक्तीने आत्मविश्वासाने घालवला पाहिजे. या वर्षाने आम्हाला शिकवले की, आपल्या प्रिय जनांसोबत वेळ घालवा.  गुडीपडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.' 

हे वाचा - परवीन बाबीमुळे कबीर बेदीने पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला

'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली होती. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाची दोन मुलं आहेत. जेनेलिया हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. पण लग्नानंतर जेनेलियाने कामातून ब्रेक घेतला आहे.  डान्स पे चान्स, मेरे बाप पहिले आप, जाने तु या जाने ना या चित्रपटांमधील जेनेलियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विषेश पसंती मिळाली.