esakal | परवीन बाबीमुळे कबीर बेदीने पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला

बोलून बातमी शोधा

kabir bedi

कबीर बेदीची पत्नी चिडून म्हणाली...

परवीन बाबीमुळे कबीर बेदीने पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला
sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेते कबीर बेदी हे त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता त्यांनी नुकतंच 'स्टोरीज आय मस्ट टेल : द इमोशनल लाइफ ऑफ द अॅक्टर' हे आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. या आत्मचरित्रात त्यांनी स्वत:च्या आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत झालेली जवळीक, पहिली पत्नी प्रोतिमासोबतचं अयशस्वी लग्न यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल ते आत्मचरित्रात व्यक्त झाले आहेत. कबीर बेदी हे परवीन बाबीच्या प्रेमात पडले होते. या दोघांचं अफेअर चांगलंच चर्चेत होतं. मात्र २००५ मध्ये परवीन बाबीने जगाचा निरोप घेतला. कबीर बेदींनी पत्नी परवीन दुसांज यांना त्यांचं नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यांच्या आयुष्यात आधीच परवीन होती. त्यामुळे पत्नी परवीन दुसांज आणि परवीन बाबी या दोघींमध्ये लोकांनी गफलत करू नये, यासाठी त्यांनी नाव बदलण्यास सांगितलं होतं. 

कबीर यांनी नाव बदलण्याविषयी बोलताच परवीन चिडल्या होत्या. याविषयी कबीर बेदी यांनी सांगितलं की, "मी तिला म्हटलं, माझ्या आयुष्यात आधीच एक परवीन होती. तर तू तुझं नाव बदलू शकते का किंवा बदलण्याविषयी काही विचार करशील का? कारण तुझं नाव ऐकून लोकांमध्ये गोंधळ होईल. मात्र हे ऐकताच ती नाराज झाली, चिडली. तुम्ही माझं नाव बदलण्यासाठी मला विचारण्याची हिंमतच कशी करू शकता, असं ती म्हणाली." परवीन यांनी त्यांचं नाव बदलण्यास साफ नकार दिला होता. मात्र जेव्हा त्या भारतात आल्या, तेव्हा त्यांना समजलं की परवीन बाबी हे नाव कबीर यांच्या आयुष्यातून कधीच विसरता न येणारं आहे. त्यानंतर कबीर बेदी हे त्यांच्या पत्नीला 'V' म्हणून हाक मारू लागले. 

हेही वाचा : ट्रोलिंगविरोधात शशांक केतकरची पोस्ट; मराठी कलाकारांनी दिला पाठिंबा

या पुस्तकात कबीर बेदी यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाविषयीही सांगितलं. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला 'ओपन मॅरेज' ही कल्पना चांगली वाटते पण नंतर त्याची फार चिंता वाटते. "या लग्नात मला केअरिंग आणि शेअरिंग हवं होतं. पण मला ते कधीच मिळालं नाही. ओपन मॅरेजची जादू वेळेनुसार ओसरली. त्यानंतर परवीन बाबीने ती पोकळी भरून काढली", असं ते म्हणाले.