esakal | तिला घाबरुन ठेवू, त्याला सगळी सूट देऊ!, अभिनेत्री हेमांगीचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

तिला घाबरुन ठेवू, त्याला सगळी सूट देऊ!,  अभिनेत्री हेमांगीचा संताप

तिला घाबरुन ठेवू, त्याला सगळी सूट देऊ!, अभिनेत्री हेमांगीचा संताप

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या परख़ड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमांगी कवीची (hemangi kavi) आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरच्या पोस्टला चाहत्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळताना दिसतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी हेमांगी ही चर्चेत आली होती. त्या चर्चेचा मुख्य विषय होता, अंतर्वस्त्र. त्यावरुन तिनं लिहिलेल्या सविस्तर पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला होता. बदलत्या सामाजिक घटनांवर सडेतोडपणे भाष्य करणारी सेलिब्रेटी म्हणून हेमांगीच्या त्या पोस्टला मराठीतील अनेक सेलिब्रेटींनी लाईक्स आणि कमेंट केल्या होत्या. तिच्या परखड प्रतिक्रियेचं स्वागतही केलं होतं. आताही हेमांगी तिच्या एका वेगळ्या विषयांवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

तिनं फेसबूकवर महिला आणि त्यांच्याकडे स्थळ, काळ यांच्या परत्वे पाहिलं जाणं, पुरुषसत्ताक पद्धतीत अजूनही न बदलणाऱ्या गोष्टींविषयी तिनं नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या त्या पोस्टमध्ये हेमांगीनं काही निरिक्षणं नोंदवली आहेत. त्यात ती म्हणते, आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती?, तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती?, किती कमवत होती?, लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तिचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरुन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यातील काही घटना अतिशय़ विकृत आणि क्रुर स्वरुपाच्या आहेत. संबंधित त्या घटनेतील नराधमांना पोलिसांनी तातडीनं शासन करावं, अशी मागणी त्यांच्याकडे नागरिकांनी केलीय. या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. त्यात सध्य़ा हेमांगीच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या पोस्टवर तिला चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या भूमिकेचं कौतूक केलं आहे.

काही दिवसांपूर्वी अंतर्वस्त्रांवरून महिलांना ट्रोल करणाऱ्यांसाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली होती. त्यात तिनं तिचे विचार मोकळेपणे मांडले होते. 'घरात किंवा बाहेर अंतर्वस्त्र घालायचे की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे', असं तिनं म्हटलं होतं. हेमांगीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं होतं. त्याच ट्रोलर्ससाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली होती. 'लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. त्यावरून जज करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा किंवा गॉसिप करण्याचासुद्धा ज्याचा त्याचा चॉईस. अंतर्वस्त्रांचा लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो. असं तिनं म्हटलं होतं.

हेही वाचा: 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा

हेही वाचा: 'तू एवढी गचाळ का राहतेस'; महिलेच्या कमेंटवर भडकली हेमांगी कवी

loading image
go to top