
‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीय.
अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात; प्रतीक शाहसोबत थाटला 'संसार'
'फुलपाखरू' फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे (Marathi Actress Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीय. हृतानं डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलाय.
सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळं प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत (Director Prateek Shah) लग्नबंधनात अडकलीय. हृता दुर्गुळेनं बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
हेही वाचा: 'नटून थटून लाजते जणू चांदणी' PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात
दरम्यान, हृतानं साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतीक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह (Actress Mugdha Shah) यांचा मुलगा आहे. त्यानं अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शनही केलंय.
Web Title: Actress Hruta Durgule Married Prateek Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..