esakal | ‘महाराणी’ येत आहे; पाहा टिझर

बोलून बातमी शोधा

Actress huma qureshi  web series maharani teaser release

या बेव सिरीजचे कथानक राणी भारती या भूमिकेवर लिहीले गेले आहे. राणीची भूमिका हूमा कुरेशीने केली आहे.

‘महाराणी’ येत आहे; पाहा टिझर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नेहमीच चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये चॅलेंजींग भूमिका करत असते. नुकतेच तिच्या नव्या वेब सिरीजचा टिझर रिलीज झाला आहे. सोनी लिव या ओटीटी प्लॅचफॅर्मवर ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. सोनी लिवने ट्विट केले आहे की,’ 90 च्या दशकात बिहारमधील राजकारणावर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे. तसेच राजकारणातील डाव पेच आणि कट कारस्थानांपासून एक अशिक्षीत महिला वाचू शकेल का? महाराणी लवकरच येत आहे आपल्या भेटीला.’

या बेव सिरीजचे कथानक राणी भारती या भूमिकेवर लिहीले गेले आहे. राणीची भूमिका हूमा कुरेशीने केली आहे. टीझर पाहून या वेब सिरीजबद्दल या प्रेक्षकांमध्ये उस्तुकता निर्माण झाली आहे. माहाराणी वेब सिरीजबद्दल सोशल मिडीयावर हूमाने लिहीले, ‘असे नेहमी होत नाही की, तुम्हाला एक अशा प्रकारची भूमिका करायला मिळते ज्यामधून तुम्हाला अभिनयाचे अनेक पैलू पहायला मिळतात. या वेब सिरीजमधील राणी ही प्रमुख भूमिका करायला मला मिळाली आहे. त्याचा मला खूप आनंद वाटत आहेत. तसेच मला अनेक प्रतिष्ठीत कलाकारांसोबत काम करण्याची संधी या वेब सिरीजमध्ये मिळाली. हा माझ्यासाठी खूप चांगला अनूभव होता.’

डिंपल खरबंदा आणि नरेन कुमार यांनी या वेब सिरीजची निर्मीती केली आहे. करण शर्मा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. हुमा कुरेशी सोबतच सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक, कानी कुसरुति आणि इनाम उल हक हे कलाकार या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. महाराणी बरोबरच हुमा अक्षय कुमारसोबत बेल बॉटम या चित्रपटामध्ये दिसणार आहे.