esakal | भुतणीच्या लग्नाला सर्वांनी यायचं हं; 'रूही' चा टीझर प्रदर्शित

बोलून बातमी शोधा

actress janhavi Kapoor varun Sharma and Rajkumar Rao film roohi will be released in march}

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या रुही अफजानाचा टीझर सोशल मीडियावर हीट होताना दिसत आहे.

भुतणीच्या लग्नाला सर्वांनी यायचं हं; 'रूही' चा टीझर प्रदर्शित
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या 'रूही अफजाना' चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये ट्रेलरविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हेही सांगण्यात आले आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून त्याविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. मागील वर्षी राजकुमार  रावचा छलांग नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या रुही अफजानाचा टीझर सोशल मीडियावर हीट होताना दिसत आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कुतूहल होते. स्त्री चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्याला अंदाज करता येईल की हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा असेल यात शंका नाही. ज्यावेळी सोशल मीडियावर रुही चा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

11 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जान्हवीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन टीझर शेअर केला आहे. तिनं लिहिले आहे की, या नवीन भुतणीच्या लग्नांमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एका जादुला सुरुवात होणार आहे.

हे वाचा - भूमीचं अनोखं 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन; नेटकऱ्यांकडून कौतुक

हार्दिक मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच दिनेश विजान आणि मॅडॉक यांच्यावतीनं निर्मिती करण्यात आली आहे. मनाली आणि उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाची शुटिंग झाली आहे. मागच्या वर्षीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र तो कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आला होता.