भूमीचं अनोखं 'व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन; नेटकऱ्यांकडून कौतुक

bhumi pednekar
bhumi pednekar

'व्हॅलेंटाइन डे' म्हणजे प्रेमाचा दिवस. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण हा दिवस आपल्या प्रिय व्यक्तींसोबत साजरा करतात. काहींनी जोडीदाराला आकर्षक भेटवस्तू दिले, तर काहींनी एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवण्याला प्राधान्य दिलं. अशातच अभिनेत्री भूमी पेडणेकरने सर्वांत अनोखा व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे.  

१४ फेब्रुवारी रोजी भूमीने पंख या संस्थेसोबत एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत गोरगरीब मुलांना पौष्टिक जेवणाचं वाटप करण्यात आलं. १०० गरीब मुलांना हे जेवण दिलं गेलं. भूमीच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. पंख संस्थेतील शिवांगी या विद्यार्थिंनीने याबाबत सांगितलं, “मी पंख क्रिएटिव्ह स्कूलची विद्यार्थिनी आहे. मी भूमीचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. मला तिचा पहिला 'दम लगा के हैशा' हा चित्रपट खूप आवडतो. त्या चित्रपटाचं शूटिंग ऋषिकेशमध्ये झालं होतं. भूमी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

सगळ्यांनी केलेल्या कौतुकामुळे भूमीसुद्धा खूप आनंदी झाली. पंख ही संस्था ऋषिकेशमधील ग्रामिण आणि गरजू मुलांसाठी काम करते. या संस्थेबद्दल माहिती मिळताच भूमीने त्यांच्यासोबत काम करायला सुरूवात केली. या उपक्रमाचे फोटो भूमीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भूमाने दम लगाके हैशा या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर बाला, पती पत्नी और वो, सांड की आँख, शुभमंगल सावधान या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com