दिल्लीच्या प्रदुषणाचा फटका बसला जान्हवी आणि कार्तिकला !

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

दिल्लीतील प्रदुषणाची तीव्रता कायम असल्याने राजधानीचा श्वास गुदमरला आहे. याचा फटका बॉलिवूडच्या कलाकरांनाही बसला आहे.

मुंबई : दिल्लीतील प्रदुषणाची तीव्रता कायम असल्याने राजधानीचा श्वास गुदमरला आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकाच्या पातळीवर पोहोचला होता. प्रदुषणाची अशी गंभीर परिस्थिती असल्याने तिथल्या शाळांना सुट्टीदेखील देण्यात आली आहे. याचा फटका बॉलिवूडच्या कलाकरांनाही बसला आहे. दिल्लीतील प्रदुषणाच्या परिस्थितीमुळे कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाचं शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि जान्हनी कपूर चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 'दोस्ताना 2' असं त्या चित्रपटाचं नाव असून दिल्लीमध्ये याचं शुटिंग पार पडणार होतं. अभिषेक बचच्न, जॉन अब्राहिम, बॉबी देओल आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'दोस्ताना' चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. हा चित्रपट 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

'दोस्ताना 2' च्या चंदीगढमधील शुटिंगचा पहिला भाग नुकताच संपला आहे. त्यानंतरचा भाग हा दिल्लीमध्ये शुट होणार  होता. तिथल्या पदुषणामुळे चित्रपटाच्या टीमने शुटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या दिल्लीमध्ये मोकळा श्वास घेणेही कठीण होऊन बसले आहे. शिवाय हवेतील दाटामुळे कॅमरामध्ये शुटींग करणेही अवघड झाले आहे. दिल्लीतील परिस्थिती जोपर्यंत मुळपदावर येत नाही तोपर्य़ंत दिल्लीमधील शुटिंगला स्थिगीती दिली आहे. 

चित्रपटाचं दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा हे करत आहेत. तर, जान्हवी आणि कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  जान्हवी कपूर 'धडक" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पमण केलं. तिचा 'गुंजन सक्सेना' हा चित्रपटही पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिकचा 'लुका छुपा' काही दिवसांपूर्वा प्रदर्शित झाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Janvhi and kartik facing issue because of Delhi pollution