esakal | 'माझा फोटो का काढला, जया बच्चन फोटोग्राफरवर रागावली'
sakal

बोलून बातमी शोधा

actress jaya bachchan angry video and photo paparazzi

न विचारता फोटो काढला यावरुन संतापलेल्या फोटोग्राफरला जया बच्चन यांनी चांगलेच धारेवर धरले. 

'माझा फोटो का काढला, जया बच्चन फोटोग्राफरवर रागावली'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सेलिब्रेटींना होणारा त्रास हा काही नवीन नाही. अनेकदा त्यांची इच्छा नसतानाही बाईट घेण्यासाठी त्यांच्या सततच्या तगाद्यामुळे ते त्रासलेले दिसून येतात. यात अनेकदा फोटोग्राफरकडून मोठ्या डोकेदुखीला सामोरं जावे लागते. यापूर्वीही काही सेलिब्रेटींनी यावरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी विराटनंही एका फोटोग्राफरला त्याचा आणि अनुष्काचा फोटो काढला म्हणून सुनावले होते.

जया बच्चन त्यांच्या सडेतोड उत्तरासाठी प्रसिध्द आहेत.आपल्याला जे आवडले किंवा पटले नाही त्याच्या विरोधात बोलण्याकरिता ते नेहमी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे पाहवयास मिळते. त्यांना आपले फोटो काढलेले आवडत नाही. त्यावरुन त्यामुळे काही फोटोग्राफरला त्यांचा ओरडा खावा लागलेला आहे. मात्र फोटोग्राफर यांना लाईव्ह फोटो गरजेचा असल्यानं ते सेलिब्रेटींचा पाठलाग काही केल्या सोडत नाही. त्यांच्याबाबत पुन्हा असाच एक प्रकार घडल्य़ानं त्या चिडल्या आहेत. त्यावरुन त्यांनी संबंधित फोटोग्राफरला झाडले आहे.

न विचारता फोटो काढला यावरुन संतापलेल्या फोटोग्राफरला जया बच्चन यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याला अखेर माफी मागावी लागली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. त्या एका डेंटल क्लिनिकमध्ये चालल्या होत्या. त्यावेळी एक फोटोग्राफर त्यांचा पाठलाग करत होता. त्या गाडीतून उतरल्यावर फोटोग्राफरनं त्यांचे फोटो काढले. हे जेव्हा जया बच्चन यांनी पाहिले तेव्हा ते फोटोग्राफरवर चिडल्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही येथे पण पोहचलात का, त्यावर उत्तर देताना तो फोटोग्राफर म्हणाला, तुमची गाडी पाहिली म्हणून थांबलो. अखेर त्या फोटोग्राफरनं माफी मागितली. 

'सरकारनं समजावलं, भाऊ अशा पध्दतीनं सिगारेट पिण्यात शहाणपणा नाही'

करण जोहर याने त्याच्या एका शो मध्ये जया बच्चन यांच्या मानसिक स्थितीविषयी सांगितले होते. तो म्हणाला होता की, जया बच्चन यांना अचानक गर्दी पाहिली की त्या त्रस्त होतात. त्यानंतर त्यांना राग येतो. मार्केटमध्ये, ट्रॅफिकमध्ये किंवा लिफ्टमध्ये असे प्रसंग येतात. आपल्याला कोणी धक्का देणे त्यांना पसंद नाही. तसेच डोळ्यावर फ्लॅश पडल्यास त्या गोंधळात पडतात. 

 
 

loading image