esakal | 'सरकारनं समजावलं, भाऊ अशा पध्दतीनं सिगारेट पिण्यात शहाणपणा नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

 kgf 2 teaser Karnataka health department and anti tobacco cell object smoking scene

कन्नड भाषेतील बहुचर्चित चित्रपट केजीएफ च्या 2 भागानं एक नवीन वाद निर्माण केला आहे. मागील आठवड्यात त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता.

'सरकारनं समजावलं, भाऊ अशा पध्दतीनं सिगारेट पिण्यात शहाणपणा नाही'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - केजीएफची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणते त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला टीझर. मात्र टीझर आता वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यात दाखविण्यात आलेल्या चूकीच्या गोष्टींमुळे समाजात वेगळा संदेश दिला जात असल्याचा आक्षेप सरकारनं घेतला आहे. एवढेच नाही तर त्यांनी या चित्रपटाचा नायक यश यालाही समज दिली आहे.

कन्नड भाषेतील बहुचर्चित चित्रपट केजीएफ च्या 2 भागानं एक नवीन वाद निर्माण केला आहे. मागील आठवड्यात त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर त्या टीझरनं चांगली हवा केली आहे. त्याचवेळी कर्नाटक राज्याच्या तंबाखू प्रतिबंधक विभागाने टीझरमध्ये दाखविण्यात आलेल्या दृश्यात यशनं सिगारेट ओढत आहे. त्यानं मशीन गनच्या नळीला सिगारेट पेटवली आहे. याप्रकारचे कृत्य हे तंबाखूचे समर्थन करणारे आहे. असे सरकारनं म्हटलं आहे.

मागील सहा दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या केजीएफच्या टीझरला 14 कोटी प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यात अभिनय केलेल्या यश, संजय दत्त, रवीना टंडन यांचे कौतूक होताना दिसत आहे. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र सरकारनं टीझरवर घेतलेल्या आक्षेपामुळे तो चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. यावर कर्नाटक राज्याच्या तंबाखू प्रतिबंधक विभागानं दिग्दर्शक प्रशांत नील, निर्माला विजय किरागंदूर आणि कर्नाटकच्या फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सला पत्र पाठवून तक्रार केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अशापध्दतीनं दाखविण्यात आलेला टीझर काढून टाकण्यास सांगितले आहे.

 'पौरशपूर पाहू नये अशी, निव्वळ भंपक; रटाळवाणी मालिका'

यासगळ्या प्रकरणावर तंबाखू प्रतिबंधक संघाने असे म्हटले आहे की, चित्रपटाचा टीझर हा ज्या माध्यमांवर शेयर करण्यात आला आहे तेथून काढून टाकावा. याबरोबरच ते पोस्टरही हटविण्यात यावेत. यश याची लोकप्रियता या भागात मोठी आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कृतींना प्रोत्साहन देऊन धुम्रपानाचे उदात्तीकरण होण्याचा धोका आहे. निर्मात्यांनी टीझर दाखवताना त्यात कुठलेही वैधानिक चेतावणी दिलेली नाही. ज्यात धुम्रपान करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे म्हटले जाणे अपेक्षित आहे.