
कपिल शर्माच्या शो मध्ये अभिनेत्री जया प्रदा आल्या होत्या. त्यांनी आपल्या आजवरच्या बॉलीवूडमधील प्रवासाविषयी सांगितले.
मुंबई - कितीही मोठे स्टार का असेनात तुमच्या सहका-याशी तुमचे मतभेद असल्यास त्यावरुन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याची काही उदारहणे बॉलीवूडमध्ये आहेत. असे काही कलाकार ज्यांच्यात कधीही समझोता झाला नाही. एकमेकांमधील अबोला तसाच राहिला. तो वाद सगळ्यांना परिचयाचा होता. त्यावरुन कितीदा चर्चाही झाली. मात्र भांडणे तशीच राहिली ती शेवटपर्यत.
कपिल शर्माच्या शो मध्ये अभिनेत्री जया प्रदा आल्या होत्या. त्यांनी आपल्या आजवरच्या बॉलीवूडमधील प्रवासाविषयी सांगितले. त्या आठवणींना उजाळा दिला. सौंदर्य, अभिनय आणि डान्स यासाठी प्रसिध्द असणा-या जया प्रदा यांनी य़ावेळी आपल्या काही महिला अभिनेत्री सहका-यांविषयीही सांगितले. यात प्रामुख्यानं उल्लेख होता तो दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा. कोणेएकेकाळी ही अभिनेत्री आपली प्रमुख सहकारी होती. मात्र तिच्यात आणि माझ्यात फारसं काही पटलं नाही. ना की कधी बोलणेही झाले. तुम्हाला सांगून खरे वाटणार नाही पण मला आणि श्रीदेवीला बहिणी समजत होते. प्रत्यक्षात एकमेकींचे कधी पटले नाही.
आम्ही कधी एकमेकींशी बोलायला देखील मागत नव्हतो. एवढा आमच्यात वाद होता. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेकांना त्याविषयी माहितीही होती. कलाकार म्हटलं की त्यामागे स्पर्धा, ईर्षा आलीच. त्याला संयमपूर्वक सामोरे जावे लागते. फार कमी जणांना त्याला मोठ्या धैर्यानं उत्तर देता येते. मला असे काही जमले नाही. माझ्यात आणि श्रीदेवीमध्ये स्पर्धा होती हे त्यावेळी काही कुणापासून लपून राहिले नाही. कित्येकदा आम्ही मोठमोठ्या पाटर्यांमध्ये आमचं भेटणं व्हायचं पण बोलणं नाही. बराचकाळ आमच्यातील हा अबोला असाच राहिला.
'अली जाफर, है हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की ?'
यावेळी जया प्रदा यांनी जितेंद्र यांचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या एकदा जितेंद्र यांनी मला आणि श्रीदेवीला एका खोलीत बंद करुन ठेवले होते. हे खरे होते. मात्र त्यावेळी एका खोलीत बंद असतानाही आम्ही एकमेकींशी काहीही बोललो नाही. जवळपास आम्ही त्या खोलीत एक तास बंद होतो. आता तिला मी खूप मिस करते. ती एक चांगली अभिनेत्री होती.