
30 Years of Kajol: फिल्म इंडस्ट्रीत तीन दशक पार ! काजोलची खास पोस्ट; म्हणाली,आणखी तीस वर्ष...
बॉलीवुडची आन बान शान ! कधी हसत तर कधी रडत आपल्या अभिनयाने कायम चाहत्यांना आपलं करणारी प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने तीस वर्षाआधी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. तीस वर्षाच्या काळानंतरही इंडस्ट्रीत तोच मान मिळवत काम करण्यासाठी आजही तयार असलेली अभिनेत्री काजोलनं या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या तीन दशकाच्या करियरमध्ये काजोलने बॉलीवुडला एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. (30 Years of Kajol in film industry)
बेखुदी या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट ३१ जुलै १९९२ ला प्रदर्शित झाला होता. यानंतर काजोल ने एका पेक्षा एक भारी चित्रपट बॉलीवुडला दिले. बाजीगर, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, गुप्त , प्यार तो होना ही था , कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, फना, तान्हाजी आणि असे कितीतरी दमदार चित्रपट काजोलने केले. चित्रपटसृष्टीत तीस वर्षे पूर्ण करण्यावर काजोलने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने यावेळी चाहत्यांचे आभार देखील मानले आहे.

काय आहे काजोलची खास पोस्ट ?
काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तिच्या या व्हिडिओमध्ये काही खास चित्रपटांतील तिच्या भूमिकेची झलक तुम्हाला बघायला मिळेल. तसेच चाहत्यांचे आभार मानत छानसं कॅप्शन तिने लिहीलंय.
'कोणी तरी मला काल विचारलं कसं वाटतंय तीस वर्षे पूर्ण करून ? खरं तर मला कसं वाटतंय हे शब्दात सांगण्यासारखं नाही. मी यावेळी एवढंच म्हणू इच्छिते, मला एवढं प्रेम आणि सन्मान देण्यासाठी तु्म्हा सर्वांचं मनापासून आभार. माझे फिल्म इंडस्ट्रीतले तीस वर्ष पूर्ण झालेत आणि अजूनही काऊंट पुढे सुरूच राहील.' या शब्दांत काजोलने चाहत्यांचे आभार मानले आहे.
काजोलच्या या पोस्टवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'तीस वर्ष अजून तुम्हाला असंच प्रेम देऊ' असंही चाहते यावेळी कमेंट करत म्हणाले.