
अभिनेत्री काजोल अजूनही घाबरते आईला.. काय आहे त्यामागचा भन्नाट किस्सा..
kajol and tanuja : बॉलिवडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) आणि त्यांची मुलगी अभिनेत्री काजोल (Kajol) या दोघी 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) च्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ये दिल्लगी, करण अर्जुन, डीडीएलजे, गुप्त, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान आणि फना यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अध्यराज्य करणारी काजोल यावेळी चक्क मराठीतून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम 11 जून रोजी प्रदर्शित होणार असून या भागात काही भन्नाट किस्से पाहायला मिळणार आहेत. (Actress Kajol still scares her mother she said this in kon honar crorepati)
हेही वाचा: मिकाचं 'मुका' प्रकरण आठवतंय का, भर पार्टीत त्यानं राखी सावंतला..
आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तनुजा आणि काजोल ही मायलेकींची जोडी 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच विशेष अतिथी भागात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने काजोलने एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपल्याला माहीत आहेच की काजोल ही अत्यंत स्पष्टवक्ती आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये अनेकजण तिला घाबरून असतात. मात्र स्वतःचा दरारा निर्माण करणारी काजोल अजूनही आपल्या आईला घाबरते. यावर विश्वास बसणार नाही, पण हा किस्सा स्वतः काजोलने सांगितला.
काजोल म्हणाली, 'लहानपणी मी खूप मस्तीखोर होती. आईचं काहीच ऐकायची नाही. त्यामुळे मी आईच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. आणि म्हणूनच आईने माझी रवानगी हॉस्टेलवर केली होती. या गोष्टीचा धसका मला अजूनही आहे. मी तिला प्रचंड घाबरते,' असे यावेळी काजोल म्हणाली. पाचगणीच्या शाळेतील शिक्षण, काजोलची वाचनाची तर तनुजाची विविध भाषा शिकण्याची आवड , निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर काम करण्याचा तनुजा यांचा अनुभव , काजोलच्या डोळ्यांचा किस्सा , काजोलच्या नावाची गंमत अशा अनेक गोष्टींचा उलगडा 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात होणार आहे.
Web Title: Actress Kajol Still Scares Her Mother She Said This In Kon Honar Crorepati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..