मिकाचं 'मुका' प्रकरण आठवतंय का, भर पार्टीत त्यानं राखी सावंतला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mika singh kissed rakhi sawant

मिकाचं 'मुका' प्रकरण आठवतंय का, भर पार्टीत त्यानं राखी सावंतला..

Happy birthday Mika Singh : राखी सावंत पाठोपाठ स्वतःच स्वयंवर लावणारा बॉलीवूड सिंगर मिका सिंग सध्या बराच चर्चेत आहे. स्वतःकरिता वधू शोधण्यासाठी त्याने चक्क स्वतःचा स्वयंवर मांडलं आहे. याच मिका सिंगचा आज वाढदिवस. त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण एक वाढदिवस असा होता की मिकाला तुरुंगाची वाट धरावी लागली होती आणि त्याला कारणीभूत ठरली आयटम गर्ल राखी सावंत. काय आहे हा भन्नाट 'किस'चा किस्सा तो ऐका.. (singer mika singh did forcibly kissed rakhi sawant on his birthday)

हेही वाचा: 'कमला पसंत का कमाल' चाहत्याच्या टीकेवर अमिताभ बच्चन संतापले, म्हणाले..

आज मीका बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्यानं आता पर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण एक वेळ अशी होती की मिका वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ही गोष्ट आहे अंदाजे १६ वर्षांपूर्वीची. २००६ मध्ये मीकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला राखी सावंत देखील उपस्थित होती. यावेळी मिकाने सर्वांसमोर राखीला किस केलं आणि हे प्रकरण रातोरात व्हरारल झालं. (mika singh kissed rakhi sawant)

हेही वाचा: PHOTO : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने शेअर केल्या मालदीवच्या आठवणी..

पुढे राखीने मिकाची तक्रार करत त्याला आधी पोलीस ठाण्यात आणि मग न्यायालयाची वारी करायला लावली होती. त्यांनतर मिकाचे आणि राखीचे संबंध पूर्णतः बिघडले. ही घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी मीका सिंहनं याबाबत स्वतःच खुलासा केला. एका मुलाखतीत तो म्हणाला, मी अंधेरीच्या एका पबमध्ये माझी बर्थडे पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी मी काही निवडक लोकांना बोलवलं होतं. यात प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आशिष शेरवूड सुद्धा सहभागी झाले होते. मी राखीला बोलवलं नव्हतं कारण मला तिचं वागणं माहित होतं. पण ती आशिषसोबत आली होती आणि माझ्यासोबत ओव्हर फ्रेंडली वागत होती.

हेही वाचा: PHOTO : 'सुख म्हणजे..' फेम मीनाक्षी राठोडच्या चिमुकलीचे क्यूट फोटो..

मिकानं पुढे सांगितलं, पार्टीमध्ये सर्वकाही ठिक चाललं होतं. राखी सुद्धा पार्टी एन्जॉय करत होती. पण तिनं माझ्या चेहऱ्यावर केक लावायचा प्रयत्न केला. मला स्कीन एलर्जी आहे. मी तिला असं करू नको असं सांगितलं होतं पण राखीनं माझ्या चेहऱ्यावर जबरदस्ती केक लावला. मला राग आला आणि रागाच्या भरात तिला धडा शिकवण्यासाठी मी तिला सर्वांसमोर किस केलं. त्यानंतर राखीनं बाहेर जाऊन खूप गोंधळ घातला.

Web Title: Singer Mika Singh Did Forcibly Kissed Rakhi Sawant On His Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top