esakal | करिश्माच्या चाहत्याचा भन्नाट व्हिडिओ, पाहिलाय?
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Karishma Kapoor

करिश्माच्या चाहत्याचा भन्नाट व्हिडिओ, पाहिलाय?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या चाहत्यांची गोष्टच निराळी आहे. आपल्या आवडत्या कलाकारांसाठी चाहते काहीही करायला तयार होतात. करिश्मा कपूर (actress karishma kapoor ) ही बॉलीवूडमधील (Bollywood actress) प्रसिध्द अभिनेत्री आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं तिनं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. दोन दशकांहून अधिक काळ तिनं आपल्या नावाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. करिश्मा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या चाहत्यानं बनवलेला व्हिडिओ. त्याला आतापर्यत 9 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. (actress karishma kapoor share video fan createdgot more 9 lakhs views)

सुरुवातीला चार तासांपूर्वी शेअर केलेल्या त्या व्हिडिओला 7 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले होते. आता ती संख्या 9 लाखांच्या (more 9 lakhs views) पुढे गेली आहे. 90 च्या दशकांत आपल्या अभिनयानं करिश्मानं प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. त्यांचे मनोरंजन केले. त्यामुळे अजूनही तिच्या अभिनयाच्या आठवणी आणि त्याविषयीचं कौतूक प्रेक्षकांच्या मनात आहे.

सोशल मीडियावर (Social Media) करिश्मा अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही वर्षांपासून तिनं बॉलीवूडपासून लांब राहणं पसंत केलं असलं तरी ती वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहत असते. खासकरुन पार्टी शो आणि फोटोसेशन यामध्ये ती जास्त बिझी असल्याचंही दिसून आलं आहे. तिच्या एका फॅन्सनं तिच्या चित्रपटांवर एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यामध्ये करिश्मानं त्या मुव्हीमध्ये जो मेक अप केला होता त्याचे डिझाईन्स त्यानं पुन्हा करिश्माच्या फोटोला स्टिक केले आहेत. तो व्हिडिओ करिश्माच्या फॅन्सला कमालीचा आवडला आहे.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनवर आणा बंदी'

हेही वाचा: TVF Aspirants च्या निर्मात्यांवर वर चोरीचा आरोप

त्या व्हिडिओला करिश्माने शेअर केले आहे. तिनं लिहिलं आहे की, मला ही मिळालेली भेट अविश्वसनीय आहे. त्यावर विश्वास बसत नाही. एक आगळ्या वेगळ्या प्रकारची कल्पना त्या कलाकारानं यात वापरली आहे. जी अत्यंत सुंदर आहे. यावेळी तिनं आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या काळात काय काळजी घ्यायला हवी याविषयीही सांगितले आहे.

loading image