अभिनेत्री करिश्मा तन्नाने पटकावले ''खतरों के खिलाडी सिझन 10'' चे विजेतेपद...

संतोष भिंगार्डे
Monday, 27 July 2020

विजेतेपद मिळविल्यानंतर करिश्मा तन्ना म्हणाली, "खतरों के खिलाडी हा माझ्यासाठी अविश्वसनीय प्रवास ठरला आहे. मी माझ्या आयुष्यात इतकं साहस आणि रोमांच कधी अनुभवला नाही. जेव्हा मी ट्रॉफी उचलली तेव्हा असामान्य प्रवास आणि बल्गेरियातील आमचा चांगला काळ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. ''

मुंबई : कलर्स वाहिनीवरील 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नाने बाजी मारली आहे. या ट्रॉफीसाठी करिष्मा तन्ना, कोरिओग्राफर धर्मेश येलांडे आणि करण पटेल यांच्यात अंतिम लढत झाली आणि त्यात करिष्माने बाजी मारली. करिश्माने तिचे बहुतेक स्टंट जिंकले आणि या रिअॅलिटी शोमध्ये रोलर कोस्टर राईडचा प्रवास केला.

'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड... 

'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचे चित्रीकरण बल्गेरिया येथे झाले होते. विजेतेपद मिळविल्यानंतर करिश्मा तन्ना म्हणाली, "खतरों के खिलाडी हा माझ्यासाठी अविश्वसनीय प्रवास ठरला आहे. मी माझ्या आयुष्यात इतकं साहस आणि रोमांच कधी अनुभवला नाही. जेव्हा मी ट्रॉफी उचलली तेव्हा असामान्य प्रवास आणि बल्गेरियातील आमचा चांगला काळ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. 

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....​

मी माझ्या अन्य स्पर्धकांचे आणि रोहित शेट्टीचे आभार मानते. त्यांनी मला संधी दिली आणि मला माझ्या भीतीवर मात करण्यासाठी प्रवृत्त केले. 'खतरों के खिलाडी'ने मला खूप काही शिकवले आहे आणि हा अनुभव माझ्याबरोबर कायम राहील." करिश्मा तन्ना ही कला चबरीया, नेत्रा रघुरामन आणि अनुष्का मनचंदा यांच्यानंतर शो जिंकणारी चौथी महिला स्पर्धक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

शो दरम्यान आगामी हंगामातील "खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया" या स्पर्धकांची नावे जाहीर झाली. एली गोनी, जसमीन भसीन, रित्विक धनंजानी, करण वाही, हर्ष लिंबाचिया यांनी या सिझनमध्ये दमदार अशी एन्ट्री केली आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत याचे चित्रिकरण होणार आहे. दिग्दर्शिका फराह खान दोन एपिसोड्सचे सूत्रसंचालन करणार आहे. नंतर रोहित शेट्टी परत येणार आहे. 
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress karishma tanna won the trophy of khataron ke khiladi season 10