भटक्या जीवांसाठी जॅकलीनची धडपड, सोशल मीडियावर पोस्ट शेअर

जॅकलीननं (jaqueline fernandez) जी पोस्ट शेअर केली आहे
 jaqueline fernandez
jaqueline fernandez Team esakal

मुंबई - कोरोनाचा सर्वांच्या जीवनमानावर प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती आहे. अनेकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशावेळी सरकारनंही पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे दैनंदिन आयुष्य आणखी कष्टप्रद झाले आहे. रस्त्यावरील भटक्या जीवांनाही दोन घास कसे मिळतील असा विचार करणा-या जॅकलीनची (jaqueline fernandez) एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात तिनं रस्त्यावरच्या भटक्या जीवांना तिनं खायला दिलं आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. जॅकलीन फर्नांडीसने 'यू ओनली लिव वन्स' (YOLO) फाउंडेशनच्या माध्यमातून भटक्या जनावरांपर्यंत जेवण पोहचवलं आहे.

जॅकलीन फर्नांडीसने (jaqueline fernandez) समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. अभिनेत्रीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. अभिनेत्रीनं आता मुक्या जनावरांसाठी पुढाकार घेतला असून हे गरीब प्राणी माणसांसारखी मदत नाही मागू शकत. जॅकलीनने नुकताच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली, ज्याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जे भटक्या जनावरांची सहाय्यता करतात.

जॅकलीननं (jaqueline fernandez) जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं लिहिलं आहे की, मी माझ्या टीममधील सर्वांनी मुक्या प्राण्यांना खाऊ घालण्याचा निर्धार केला होता. आणि तो यशस्वीही झाला. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. मी त्यांची आभारी आहे, सध्याची परिस्थिती पाहता आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढाईची गरज आहे. केवळ आपलाच विचार न करता रस्त्यावरील जीवांचाही विचार केला पाहिजे असे मला वाटते. अशी भावना जॅकलीननं यावेळी व्यक्त केली आहे.

 jaqueline fernandez
कर्जतच्या एनडी स्टुडिओत अग्नितांडव; 'जोधा अकबर'चा सेट जळून खाक
 jaqueline fernandez
रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल

जॅकलीननं (jaqueline fernandez) आपल्या YOLO फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवले आहे. अभिनेत्रीने नुकताच रोटी बँक फाउंडेशनचा दौरा केला. जॅकलीन मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात तिने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com