अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhavi gogate

अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

मुंबई : गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या लोकप्रिय नाटकांमध्ये तसेच घनचक्कर, सत्त्वपरीक्षा, डोक्याला ताप नाही अशा काही मराठी चित्रपटांबरोबरच मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे आज सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर घनचक्कर या चित्रपटात माधवी गोगटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गेला माधव कुणीकडे हे त्यांनी अभिनेता प्रशांत दामलेंबरोबर केलेले नाटक खूप गाजले होते. मराठी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या गाजलेल्या नाटकांबरोबरच, अंदाज आपला आपला अशा काही नाटकांमध्ये त्यांनी काम केले. राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा, कहीं तो होगा अशा काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांनी मांडल्या आपल्या व्यथा;पाहा व्हिडिओ

स्टार प्रवाहवरील स्वप्नांच्या पलीकडले, झी युवा वाहिनीवरील तुझं माझ जमतंय या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी रंगभूमीबरोबरच मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. दंगल टीव्हीवर त्यांची सिंदूर की किमत ही मालिका सुरू होती. ही मालिका त्या सोडणार अशी चर्चा रंगलेली होती. स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. या मालिकेत अनुपमाच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.

loading image
go to top