पूरग्रस्त पाकिस्तानला मदतीचे आवाहन करताच माहिरा खान होतेय ट्रोल

सध्या पुरामुळे पाकिस्तानमधील स्थिती गंभीर बनली आहे.
Mahira Khan
Mahira Khan esakal
Updated on

Mahira Khan Appealing To People To Help Flood Hit Pakistan : पाकिस्तानमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत बिकट असून सर्व सेलिब्रिटी मदतीसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व दिग्गजांनी स्वतः पूरग्रस्तांसाठी देणगी दिली असताना अलीकडेच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने ट्विट करून लोकांना पूरग्रस्तांसाठी देणगी देण्याची विनंती केली आहे. एक ट्विट रिट्विट करताना माहिरा खान म्हणाली की, कमी-अधिक प्रमाणात, तुम्हाला जे काही करता येईल ते करा.

Mahira Khan
'ब्रह्मास्त्र'च्या निर्मात्यांना आर्थिक फटका, पोलिसांमुळे दीड कोटींचे नुकसान

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ट्रोल

या ट्विटवर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ट्रोल झाली. विशेष म्हणजे माहिरा खानला ट्रोल करणारे बहुतांश युजर्स पाकिस्तानी आहेत. एका यूजरने लिहिले - कुठे आहेत आमचे बेईमान कलाकार. लोकांच्या पैशाने ते नाटक, चित्रपट यशस्वी करतात.

त्यांना विनंती करणार ! दुसर्‍या युजरने लिहिले की, 'माहिरा, तू पुराबद्दल जे काही बोलत आहेस ते खरे आहे. पण पुरात अडकलेल्यांना जर तू मदत करू शकत असेल तर तू करायला हवी. तसंच अनेकांनी माहिरा खानसाठी ट्विट करून तिला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. माहिराने अनेक भारतीय चित्रपटांमध्येही (Bollywood News) काम केले आहे.

Mahira Khan
तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

'रईस'मध्ये शाहरुखसोबत दिसली होती.

ती शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) २०१७ मध्ये आलेल्या 'रईस' या चित्रपटात काम करताना दिसली होती. या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही आणि त्यात एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या कामामुळे तिला ट्रोलही करण्यात आले. या चित्रपटाचे बजेट ९० कोटींच्या आसपास होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com