
Brahmastra Pre Release Event Cancelled : 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेवटच्या क्षणी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रम रद्द झाला आहे. यामुळे १ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्युनिअर एनटीआर होते. या प्री-रिलीज कार्यक्रमात रणबीर कपूर, आलिया भट (Alia Bhatt), मौनी राॅय आणि एस.एस. राजामौली आणि करण जोहर (Karan Johar) हे उपस्थित राहणार होते.
निर्मिती विभागातील सूत्रांनी सांगितले, पोलिसांची परवानगी घेतली होती. पण प्रचंड गर्दीमुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे निर्मात्यांचे १.५० कोटींचे नुकसान झाले. ब्रह्मास्त्रच्या (Brahmastra Film) कार्यक्रमात ज्युनिअर एनटीआरबरोबर चित्रपटातील पूर्ण टीम त्यात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट, मौनी राॅय आणि नार्गाजुन यांचाही समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या परवानगीत म्हटले होते, की सध्या गणेश उत्सवामुळे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तच्या कामात पोलिस अडकले आहेत. त्यामुळे पुरेसे पोलिस कर्मचारी कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवणे शक्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.