
रागात माहिरा शर्माने अर्ध्यातच सोडला इंटरव्यू,काय होते कारण ?
बिग बॉस १३ नंतर माहिरा शर्माने जिथे मीडिया अटेंशन मिळवले होते तेथे तिच्या रागाने आता परत एकदा ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.(MAhira Sharma)माहिरा शर्मा ही बिग बॉस १३ ची कन्टेस्टंट होती.या शो नंतर तिला चांगलीच लोकप्रसिद्धी मिळाली होती.अलीकडे एका मुलाखतीत झालेल्या किस्स्यानंतर मात्र माहिराच्या चर्चेची दिशा आता बदललेली दिसते.
माहिरा ही प्रसिद्ध टीवी अॅक्ट्रेस आहे.(Punjabi Songs)तसेच पंजाबी गाण्यांच्या अल्बम आणि चित्रपटांकडे तिचा विशेष कल आहे.बीग बॉस १३ मधील पारस आणि माहिराच्या मैत्रीचीही बीग बॉस शो दरम्यान खूप चर्चा होती.त्या दोघांचे अफेअर असल्याचीही बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती.सध्या मात्र माहिराच्या रागाची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे.नेंमका तीला कसला राग आला होता ते जाणून घेऊया.
हेही वाचा: Big boss: बिचुकलेचं करण कुंद्राला हिणवणारं ट्वीट चर्चेत;नेटकरी संतापले
अलीकडेच माहिराला मीडिया कॅमेरात स्पॉट केले गेले होते.तेव्हा ती आधीपेक्षा लट्ठ दिसत होती.तीच्या लट्ठपणावर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स केले गेले.तीला सोशल मीडियावर ट्रोल देखिल केले गेले.एका मुलाखतीमध्ये तीला बोलवले गेले तेव्हा माहिराला तीच्या लट्ठपणावरच प्रश्न विचारण्यात आला.तीला हे अजिबात आवडले नाही.तीला त्या प्रश्नाचा प्रचंड राग आला आणि ती,'मुझे ये सवाल पसंद नही आया.ये सवाल नही पुछना चाहिये था.'असे म्हणत ती कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच निघून गेली.या घटनेची सोशल मीडियावर सध्या फार चर्चा सुरू आहे.अनेक जणांनी तर माहिरने शो सोडायला नको होता.तीला मॅनेज करता आले नाही असे कमेंट्स सोशल मीडियावर केले आहेत.
Web Title: Actress Mahira Sharma Left The Interview Angry On Reporter In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..