esakal | मग ते काम कधी करतो? मलायकाच्या प्रश्नावर कपिलनं दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'मग ते काम कधी करतो'? मलायकाच्या प्रश्नावर कपिलनं दिलं उत्तर

'मग ते काम कधी करतो'? मलायकाच्या प्रश्नावर कपिलनं दिलं उत्तर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हजरजबाबीपणामुळे कपिल शर्मा त्याच्या शो मध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्यानं आता त्या शो ची उंची वाढवली आहे. त्याला कारण त्याचं बोलणं आणि संवाद साधण्याची शैली. त्याच्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे सेलिब्रेटी येतात. ते कधी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात तर कधी वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी. यावेळी कपिल सगळ्यांना बोलतो करतो. त्याच्याकडे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून नवोदित कलाकारांमधील टायगर श्रॉफ पर्यत सर्वजण आले आहेत. त्या कलाकारांची फिरकी घेत त्यानं प्रेक्षकांना मनमुराद हसवलंही आहे. मात्र कधी कधी जे घडतं त्याला कपिलला सामोरं जावं लागतं. हे दिसून आलं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये कपिलच्या शो मध्ये बॉलीवूडमधल्या काही सेलिब्रेटी सहभागी होणार आहे. त्यात मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांचा समावेश आहे. चॅनलनं त्याचा एक धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या प्रोमोमध्ये मलायकानं कपिलला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला त्यावेळी आपण का उत्तर द्यावं हे काही कपिलला सुचलं नाही. मात्र जे उत्तर दिलं. ते ऐकुन प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही. शो मध्ये टेरेन्सनं आपल्या चष्म्याविषयी देखील नव्यानं खुलासा केलाय.

इंडियाज बेस्ट डान्सर्सची टीम कपिलच्या शो मध्ये आल्यावर त्यांनी खूप धमाल केल्याचे दिसुन आले. एकमेकांची थट्टा मस्करी करत त्यांनी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. सर्वात गंमतीशीर प्रसंग होता मलायकानं कपिलला प्रश्न विचारण्याचा. मलायका त्याला म्हणते, आमचा शोा हा सीझनल आहे. त्यामुळे आम्हाला त्या शो नंतर सुट्टी मिळते. तुमचा तर डेली शो आहे. वर्षभर तुम्हाला शुटींग करावी लागते. तर मग तुझ्या हाताशी किती वेळ उरतो. तेव्हा गीता मलायकाला म्हणते, तुला मुलं असं म्हणायचं आहे का, मलायका म्हणते हो....त्य़ावर कपिल त्यांना उत्तर देतो, साडेनऊ ते अकरा पर्यत शो सुरु असतो. त्यानंतर निर्माते जेव्हा सीआय़डी सुरु करतात तेव्हा.....या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांना हसू काही केल्या आवरत नाही.

हेही वाचा: स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ

हेही वाचा: आजपासून ऑटो-डेबिट बंद; परवानगीशिवाय कापले जाणार नाहीत पैसे

loading image
go to top