शेवटी मलायकाचाच मुलगा तो, फिटनेसची आवड असणारच

त्यावर चाहत्यांनी त्या फोटोंवर कौतूकचा वर्षाव केला आहे.
arhan and malaika arora
arhan and malaika arora Team esakal

मुंबईः बॉलीवूडची अभिनेत्री मलायका अरोरा (bollywood actress malaika arora) तिच्या हॉटनेससाठी (hotness) प्रसिध्द आहे. तिनं वयाची चाळीशी ओलांडली असली तरी तिच्या फिटनेसचे फोटो प्रेक्षकांना भुरळ पाडत असतात. मलायकाप्रमाणेच तिच्या मुलालाही फिटनेसची जाम क्रेझ आहे. त्याचेही फिटनेसचे काही फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाले आहेत. त्यावर चाहत्यांनी त्या फोटोंवर कौतूकचा वर्षाव केला आहे. मलायका आणि फिटनेस अशी तिची आता ओळख झाली आहे. (actress malaika arora son arhaan khan obsessed fitness muscles building)

लॉकडाऊनमध्ये (lockdown) अभिनेत्री मलायकानं (actress malaika arora) आपल्या फिटनेसच्या (fitness) व्हिडिओनं चाहत्यांना खुश केलं होतं. तिचे ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले होते. सोशल मीडियावर तिचे ते फिटनेस ट्रेनिंगचे व्हिडिओ, योगाचे व्हिडिओ पॉप्युलर झाले आहेत. त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. केवळ मलायकाच नाहीतर तिच्या मुलाला म्हणजेज अरहान खानलाही फिटनेसचे वेड आहे. त्याची माहिती तिनं सोशल मीडियावरुन दिली आहे. अरहान हा फिटनेससाठी जुनूनी आहे. असं तिचं म्हणणं आहे.

एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं होत, मी सध्या अरहानला योगाअभ्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यात त्याला रस आहे. त्याची ती आवडही आहे. त्यामुळे त्यात त्यानं काही भरीव कामगिरी करावी असे मला वाटते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं, तो फिटनेससाठी नेहमीच काळजी घेतो. शिस्तीचं पालन करतो. त्याचे आहारावर नियंत्रणही आहे. तो सध्या अशा वयात आहे त्यात जीमला जाणं सगळ्यात महत्वाचं असतं.

arhan and malaika arora
'तारक मेहता'मधील हे कलाकार आहेत अजूनही सिंगल
arhan and malaika arora
'अग्गंबाई सासूबाई' मालिका का सोडली? तेजश्रीने सांगितलं कारण;व्हिडिओ

अरहानला असणारी फिटनेसची आवड मलाही जास्त महत्वाची वाटते. ती त्याची पॅशन आहे. त्याला योगाची आवड आहे हे मला समाधानकारक वाटते. मी नेहमीच त्याला योगाचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे आता त्याला त्याची आवड निर्माण होते आहे. त्यात त्यानं आणखी स्वतला विकसित करावे असे वाटते. योगा केल्यानं त्याचं शरीर आणखी लवचिक होईल. त्यामुळे मी त्याला योगा करण्याचा सल्ला देत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com