सर्जरी करुनही फेमस नव्हे 'फ्लॉप' झालेली हिरॉईन

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

2005 मध्ये शुजित सरकारनं केलेल्या यहॉ या चित्रपटापासून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर कॅडबरीच्या जाहिरातीत ती दिसली होती.

मुंबई - काही अभिनेत्रींच्या पाठीशी गॉडफादर असला तरी त्यांना जास्त काळ बॉलीवूडमध्ये टिकाव धरता आलेला नाही. त्या दिसायलाही फार सुंदर होत्या असे नाही. अभिनयाच्या बाबतही बोंबच होती. तरीही कुणाच्या का वशिल्यानं त्यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री केली. नावापुढे अभिनेत्री असल्याचं बिरुद चिटकलं. त्यानंतर पुढच्या एक दोन वर्षात अशा अभिनेत्री कुठे दिसल्या नाहीत.

मिनिषा लांबा ही अशी एक अभिनेत्री जी तिच्या दिसण्यामुळे प्रसिध्द होती. जेमतेम अभिनय, डान्समध्येही फारशी गती नसलेल्या मिनिषा निवडक चित्रपट करुन बाहेर पडली. त्यानंतर तिला फारशी संधी काही मिळाली नाही. 18 जानेवारी 1985 मध्ये नवी दिल्ली येथे जन्म झालेल्या मिनिषानं कॉर्पोरेट, हनीमून ट्रॅव्हल्स, दस कहानिया, बचना ऐ हसीनो, भूमी सारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केले होते. दिल्लीतील मिरांडा हाऊस महाविद्यालयात शिक्षण घेणा-या मिनिषानं मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Minissha (@minissha_lamba)

2005 मध्ये शुजित सरकारनं केलेल्या यहॉ या चित्रपटापासून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर कॅडबरीच्या जाहिरातीत ती दिसली होती. त्यावेळी दिग्दर्शक शुजित सरकार यांनी तिला संधी दिली. मात्र तो चित्रपट तिला काही लाईमलाईट मध्ये घेऊन गेला नाही. तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यानंतर मिनिषा ही बिग बॉसच्या 8 व्या सीझनमध्येही दिसली होती. त्यावेळी तिच्या बरोबर राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर हाही एक स्पर्धक होता. तेव्हा आर्यनं असा खुलासा केला होता की, तो आणि मिनिषा हे रिलेशनशीप मध्ये होते याचा. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर मिनिषानं हे सगळं खोटं असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, आम्ही दोघांनी कधीही एकमेकांना डेट केलं नाही.

 'कंगणावर चोरीचा आरोप, 1950 च्या अगोदर कसला आला कॉपीराईट

चित्रपटात यश मिळाले नाही मग तिनं छोट्या पडद्यावरही तिनं स्वतला सिध्द करण्याचा प्रयत्न केला. ‘छूना है आसमान’, ‘तेनाली रामा’ आणि  ‘इंटरनेट वाला लव’ अशा मालिकांमध्ये ती दिसली होती. आता ती सोशल मीडियावर एक सेलिब्रेटी म्हणून अॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. तिला फॉलो करणारा प्रेक्षक मोठा आहे. आता मात्र तिच्या लुकमध्ये खूप फरक आला आहे. याचे कारण म्हणजे तिनं केलेली प्लॅस्टिक सर्जरी हे होय. 2015 मध्ये तिनं रेयान थाम याच्याशी गुपचूप लग्न केलं. त्यानंतर ती चर्चेत आली ते तिच्या नाक आणि ओठांच्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे. त्यामुळे बराच काळ ट्रोल झाली होती. 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Minissha lamba birthday special lesser and plastic surgery