esakal | 'डुप्लिकेट मेडिसिन', ग्लुकोज भरुन विक्री, अभिनेत्रीची पोस्ट

बोलून बातमी शोधा

actress mouni roy
'डुप्लिकेट मेडिसिन', ग्लुकोज भरुन विक्री, अभिनेत्रीची पोस्ट
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढणारा कहर सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. त्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. अशावेळी कोरोनासाठी महत्वाच्या ठरणा-या मेडिसिनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हॅक्सिनचा काळाबाजार करणा-यांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस तपास करत आहे. यासगळ्या परिस्थितीवर बॉ़लीवूडमधील सेलिब्रेटींनी आपल्या परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसिध्द मॉडेल आणि अभिनेत्री मौनी राय हिनं सोशल मीडियावर मेडिसिनचा काळाबाजार कऱणा-यांवर सडकून टीका केलीय.

मौनी रॉय सोशल मीड़ियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. याशिवाय ती तिच्या परखड मत व्यक्त करण्याबद्दलही प्रसिध्द आहे. सध्या ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोना प्रतिबंधक मेडिसिनचा जो काळाबाजार सुरु आहे त्यावर तिनं टीका केलीय. इंस्टावर तिनं काही फोटो शेअर करुन आपला राग व्यक्त केला आहे. जे काही चाललं आहे ते सगळ्यात लाजीरवाणं असल्याचं मत तिनं व्यक्त केलं आहे. फोटोबरोबरच तिनं व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. तिच्यासह अनेक सेलिब्रेटींनी अशाप्रकारच्या घटनेवर नाराजी व्यक्त केलीय.

img

fake corona medicine

मौनीच्या त्या पोस्टवर बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अर्जित तनेजा, अर्जुन बिजलानी, जेनिफर विंगेट, सोफी चौधरी, आशा नेगी, सिमरन यांचा समावेश आहे. मौनीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, लज्जास्पद, सध्याच्या कोरोनाच्या मेडिसिनचा जो काळाबाजार सुरू आहे ते पाहून वाईट वाटले. चीडही आली. आपण सर्वजण मानतो आहोत की कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. ती रोखण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. मात्र त्याचवेळी जे काही चालले आहे ते किळसवाणे आहे. यासगळ्या प्रकाराचा तपास व्हायला हवा.

हेही वाचा: ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

हेही वाचा: 'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

कोरोनासाठी अतिशय उपयोगी मेडिसिन म्हणून विकलं जातयं. की ज्यात ग्लुकोज भरलं जातयं. आणि त्याची विक्री पाच हजार रुपयांना केली जातेय. अशाप्रकारचे कृत्य करणा-यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. सध्या सोशल मीडियावर डुप्लिकेट कोरोनाचे व्हॅक्सिन बनविणा-यांचे व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. मात्र त्याची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.