esakal | केकचा फोटो शेयर करुन नुसरतनं सांगितलं, झालं दुसरं लग्न!
sakal

बोलून बातमी शोधा

केकचा फोटो शेयर करुन नुसरतनं सांगितलं, झालं दुसरं लग्न!

केकचा फोटो शेयर करुन नुसरतनं सांगितलं, झालं दुसरं लग्न!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री आणि खासदार अशा दोन्ही भूमिकेत वावरणाऱ्या नुसरत जहाच्या वाट्याला प्रसिद्धी आणि टीका आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. तिचं पहिल लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडलं. त्यामुळे तिला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. सध्या तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. निखिल जैनसोबत झालेल्या वादानंतर तिनं आता बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत संसाराला सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्याचे फोटोहा व्हायरल झाले आहे. त्यावरुन तिनं आता त्याच्याशी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केल्याचे सांगितलं जात आहे. नुसरतनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंवरुन तिनं त्याच्याशी लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

खरं तर नुसरत जहा आणि यश दासगुप्ता हे आता आई बाबा झाले आहे. मात्र नुसरतनं आपल्या दुसऱ्या लग्नाविषयी कुठेही वाच्यता केली नव्हती. आता तिच्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसुन आले आहे. त्यावरुन तिच्या चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, तिचं दुसरं लग्न झालं आहे. दहा ऑक्टोबरला यशचा वाढदिवस होता. त्यावेळी तिनं केकचा फोटो शेयर केला. त्यावर लिहिलं होतं पती आणि बाबा. त्यावरुन तिनं दुसरं लग्न केलं आहे. अशी चर्चा मनोरंजन विश्वात रंगली आहे. यावेळी तिनं यशसोबत आणखी एक फोटोही शेय़र केला आहे त्यामध्ये ती आणि तो एका डायनिंग टेबलवर बसलेले दिसून आले आहे. नुसरनं यशला बर्थ डे ची मोठी ट्रीट दिली आहे. त्या फोटोंना कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, हॅप्पी बर्थ डे....

26 ऑगस्टला नुसरतनं एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ईशान असे आहे. याची माहिती तिनं काही सोशल मीडियावर दिली नाही. मात्र तिनं त्याच्यासोबतचे काही फोटो शेयर केले होते. त्यानंतर सगळ्यांना माहिती झालं की ती आई झाली आहे. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. नुसरत आणि निखिलचं लग्न 2019 मध्ये तुर्कीमध्ये झालं होतं. काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अडचणीत

हेही वाचा: बाळाच्या वडिलांबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या नुसरत जहां

loading image
go to top