ड्रग्जसोबत बर्थ डे सेलिब्रेशन,अभिनेत्रीला अटक

मित्रांसोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन
Drugs
Drugs

ड्रग्जचं सेवन केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी Mumbai Police तेलुगू अभिनेत्री नायरा शाह Naira Shah आणि तिचा मित्र साजिद हुसैन यांना अटक केली. या दोघांवर परवानगीशिवाय पंचतारांकित हॉटेलच्या रुममध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. नायराने 'मिरुगा', 'बुर्रा कथा' आणि 'इ-ई' या चित्रपटांमध्ये काम केलंय. मुंबई पोलिसांनी जुहू परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकत ही कारवाई केली. नायराची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (actress naira shah was arrested for consuming drugs)

रविवारी नायराचा वाढदिवस होता आणि दोन मित्रांसोबत ती हॉटेलच्या रुममध्ये पार्टी करत होती. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यांनी अटकेची कारवाई केली. घटनास्थळी पोलिसांना ड्रग्ज आढळले. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अटकेनंतर नायराला सोमवारी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिची जामिनावर सुटका केली. सोमवारी सकाळी नायराची मेडिकल टेस्ट करण्यात आली. रिपोर्टमध्ये जर नायराच्या शरीरात प्रमाणापेक्षा अधिक ड्रग्ज आढळल्यास, तिच्या अडचणीस वाढ होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com