esakal | दिल्लीची फ्लाईट पडली 7 लाखाला: बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीला लुटलं
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीची फ्लाईट पडली 7 लाखाला: बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीला लुटलं

दिल्लीची फ्लाईट पडली 7 लाखाला: बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीला लुटलं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील एक मोठी घटना समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री निकिता रावलला (nikita rawal) बंदूकीचा धाक दाखवून तिला धमकावण्यात आले आहे. आपल्याबाबत घडलेल्या प्रसंगाविषयी तिनं सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती काही दिवसांपूर्वी शुटींगच्या निमित्तानं दिल्लीला गेली होती. त्यावेळी तिथं तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तिला बंदूकीचा धाक दाखवून सात लाखांची रक्कम काढून घेण्यात आली. याप्रकारामुळे निकिता मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निकिता आपल्या काही प्रोजेक्टवर काम करत नसल्याचे दिसून आले आहे. त्याचे महत्वाचे कारण तिच्याबाबत दिल्लीमध्ये घडलेला प्रकार. दिल्लीमध्ये ती एका इव्हेंटसाठी आली होती त्यावेळी तिला शास्त्रीनगरमधील आपल्या एका नातेवाईकाकडे जायचे होते. मात्र दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्यानं ती हादरुन गेली. त्यानंतर तिनं तातडीनं दिल्लीतून बाहेर जाण्यासाठीची फ्लाईट घेतली. गेल्या रविवारी ही घटना घडली. तिनं सांगितलं, रात्रीचे दहा वाजले होते. मी पायी माझ्या नातेवाईकांकडे निघाली होते. त्यावेळी एक चारचाकी वेगानं माझ्याजवळ आली. त्यातील चार जणांनी मला धमकावलं. त्यांनी बंदूक दाखवली. माझ्याकडून पैसे काढून घेतले.

अभिनेत्रीनं सांगितलं की, माझ्याकडून पैसे ते घेऊन गेले. याचा मानसि त्रास मला झाला आहे. त्यावेळी मला असं वाटलं की ती लोकं मला मारुन टाकतील की काय, मी खूप घाबरले होते. त्यांनी माझ्यासोबत काहीही केलं असतं असं मला तेव्हा वाटलं. मी एकटी काय करणार होते तेव्हा, जेव्हा मुंबईला आले तेव्हा माझ्या वकिलाशी बोलून घेतलं. कायदेशीर सल्ला घेतला. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, एफआयआर दाखल करण्यासाठी मलाच जावे लागेल. माझ्याकडून त्या चोरांनी अंगठी, दागिने आणि काही रक्कम असे एकूण सात लाखांचा ऐवज नेला.

हेही वाचा: सलमान खानमुळे 'या' अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव

हेही वाचा: खान अभिनेते कुठल्याच मुद्द्यावर बोलणार नाहीत, नसीरुद्दीन शहा भडकले

loading image
go to top