अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण

अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या ड्रायव्हरला जुहू परिसरात मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
nivedita saraf
nivedita saraf google

Entertainment news : अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ (nivedita saraf) यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी (जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट) जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आली आहे. मुंबईतील पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

nivedita saraf
'लता मंगेशकर पाया कधीच पडू द्यायच्या नाहीत'; आशा भोसलेंना आली दीदींची आठवण

प्रभादेवी येथे २२ मार्च रोजी दोन दुचाकी स्वारांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची घटना अगदीच ताजी आहे. वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या एका दुचाकीस्वराच्या भाच्याला दुसऱ्या दुचाकीस्वाराने चाकूने भोसकले. या प्रकरणात ज्यावर चाकू हल्ला झाला ती व्यक्ती माजी कब्बडीपट्टू होती. तर काहीच दिवसांपूर्वी एका विलेपार्ले येथे एका हिरे व्यापाऱ्याला एका मोठ्या वाहन चालकाने त्याच्या वाटेत आल्याने खेचून नेले होते.

अशातच अभिनेत्री निवेदिता सराफ यांची घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या वाहन चालकाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे.

nivedita saraf
विल स्मिथ थप्पड प्रकरणात कंगनाची उडी; म्हणाली, 'मी असते तर...'

'विलेपार्ले येथून घरी परतत असताना रात्री १०. ३० च्या सुमारास लाल सिग्नल लागल्यावर रस्त्यावर थांबलो असता, मागून संबंधित सेडान चालकाने धडक दिली,' अशी माहिती अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोलिसांना दिली आहे.

nivedita saraf
Russia Ukraine War: युक्रेनच्या समर्थनार्थ प्रियंकाची पोस्ट, केलं मोठं विधान

'मागील गाडीने धडक दिल्यानंतर निवेदिता यांच्या वाहनाचा चालक अजय ठाकूर (३८) वाहनाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी गाडीबाहेर पडला. त्यावेळी सिडान चालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनतर निवेदिता चालकाला मारहाण करून तो त्याने निवेदिता यांच्या गाडीकडे येत काचेला धडक देत निवेदिता यांना काच खाली घेण्यास सांगितली,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. समोरील व्यक्ती काहीशी घाबरल्याचे लक्षात येताच निवेदिता यांचा चालक ठाकूर याने पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. त्यावेळी सेडान चालक तातडीने निघून गेला. मात्र तिथून पळ काढताना त्याच्यासमोर बेस्ट बस आडवी आली . यावेळी बेस्ट बस चालकाला शिवीगाळ करून तो पुढे निघून गेला,' अशी माहिती समोर आली आहे.

निवेदिता यांच्या वाहनचालकाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांक MH-15-BD-9945 असा असून त्यांच्या मालकाचा शोध घेण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. लवकरच संबंधित व्यक्तवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com