esakal | तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; 'या' अभिनेत्रीकडून माणुसकीचे दर्शन...
sakal

बोलून बातमी शोधा

helps to lgbt

लॉकडाऊन काळात रोजगाराचे साधन नसल्याने अनेक कुटूंबाना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य नागरिकांना जिथे आर्थिक विवंचना भेडसावत असते, तिथेच दुसरीकडे समाजातील आपल्याच पण दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांची अवस्था आणखी बिकट आहे.

तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; 'या' अभिनेत्रीकडून माणुसकीचे दर्शन...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊन काळात रोजगाराचे साधन नसल्याने अनेक कुटूंबाना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य नागरिकांना जिथे आर्थिक विवंचना भेडसावत असते, तिथेच दुसरीकडे समाजातील आपल्याच पण दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांची अवस्था आणखी बिकट आहे. मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या तृतीयपंथीय समाज बांधवांसाठी अभिनेत्री डॉ. परिणीता पावसकर ही पुढे सरसावली असून तिने या बांधवांना अन्नधान्य वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. 

फादर्स डे स्पेशल : 'या' कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना...

कोरोनामुळे आपण प्रत्येक जण एकमेकांपासून सोशल डिस्टन्स ठेवून राहतो, हाताला वारंवार सॅनिटायझर लावतो अशा परिस्थितीत चंदा मागून जगणाऱ्या तृतीयपंथीय बांधवांना तर कोणी क्वचितच चंदा देण्यासाठी उभं करतात. दोनवेळच्या जेवणासाठीही त्यांना फिरावे लागत आहे. अशांसाठी परिणीताने स्वखर्चाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. 

क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 

तिच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत मदत केली. यातूनच तिने कुर्ला, माहुल, चेंबूर, गोरेगाव, कांदिवली येथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तू. अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी तिच्यासोबत अनिकेत राणे, स्वप्निल पाटील, पूनम साखरकर उपस्थित होते. परिणीता ही सोनी मराठीवरील 'स्वराज्य जननी जिजामाता' मालिकेत गोदावरीची भूमिका साकारत असून तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळावं, इतरांच्या बरोबरीने काही काम मिळावं यासाठी प्रयत्नशील असते.

loading image