esakal | क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 
sakal

बोलून बातमी शोधा

fire brigade officer

मुंबईत कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही आहे. कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांसोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानही आपली सेवा बजावत आहे. मुंबईतील ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळतो,

क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही आहे. कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांसोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानही आपली सेवा बजावत आहे. मुंबईतील ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळतो, तो परिसर, इमारत निर्जंतुक करण्याची जबाबदारी अग्निशमन दलाच्या जवानांवर असते. दरम्यान, ही जबाबदारी पार पडताना त्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे.

सौरव गांगुलीच्या कुटूंबापर्यंत पोहचला कोरोना; वाचा कोण कोण झाले बाधित...

आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील 98 अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाचे प्रादेशिक विभागीय अधिकारी ए. व्ही. परब यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तब्बल 20 दिवस परब हे रुग्णालयातील आयसीयूमध्ये मृत्यूशी झूंज देत होते. कोरोनावर यशस्वी मात करुन ते आज घरी आले.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

परब यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 20 दिवसापेक्षा अधिक दिवस ते आयसीयूमध्ये कोरोनाशी झुंजत होते. त्यांचा हा लढा यशस्वी झाला असून आजारावर मात करुन ते आज घरी आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

मुंबई अग्निशमन दलावर शहरातील विविध ठिकाणच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र, रुग्णालय तसेच इतर परिसरातही अग्निशमन दलाकडून अविरत काम सुरु आहे. त्यात 98 अधिकारी आणि जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 22 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 25 जण स्वत:च्या घरी, कोव्हिड केअर केंद्रात आणि अग्निशमन केंद्रात क्वारंटाईन आहे. तर 44 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण केंद्रही तयार करण्यात आले आहे. 

loading image
go to top