Lock Up Show:नवऱ्यानं पुनमला असं फटकावलं की थेट ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीला कसलाच वास येईना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Poonam pandey reveals her past husband domestic violence on her

नवऱ्यानं पुनमला असं फटकावलं की थेट ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीला कसलाच वास येईना!

'लॉक अप शो' दरम्यान अनेकांनी त्यांचे रहस्य जगापुढे आणले आहेत.त्यांच्या या रहस्यांचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा त्यांच्या सोशल मीडियावर भलत्याच चर्चा उडाल्या होत्या.पूनमचेही एक सत्य नूकतेच बाहेर पडले असून आता तीच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.पूनमला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याचा खुलासा तीने केलाय.

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने नुकताच खुलासा केलाय.पूनमचा पती सॅम बॉम्बे ह्याने तीला दिलेल्या त्रासाचा उल्लेख तीने या खुलास्यात केल्याचे दिसते.त्याने तीला अनेकदा मारहाणही केली आहे.(Lock up Show)त्याच्यामुळे तीला आता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिचा माजी पती सॅम बॉम्बेबद्दल काही धक्कादायक तीने खुलासे केले आहेत. 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर, कौटुंबिक हिंसाचारामुळे तिला झालेल्या दुखापतींमुळे पूनमने तिला सध्या भेडसावत असलेल्या समस्यांबद्दल खुलासा केला.

हेही वाचा: Lock Upp: आता रडून काय उपयोग! पुनम पांडे शोमधून बाहेर

पूनम तीच्या डोक्याला झालेल्या दुखापतींवर बोलताना म्हणाली,'मला काही गोष्टींचा अजिबात वास येत नाही, मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना वासाबद्दल विचारते.माझ्या डोक्याला झालेल्या दुखापतीनंतर मी कुठल्याही गोष्टींचा वास घेण्याची क्षमता गमावून बसली आहे.हा त्रास माझ्या ब्रेन हॅमरेजशी जुडलेला आहे.माझ्यावर झालेल्या हिंसाचारामुळे मला या त्रासांना सामोरे जावे लागत असले तरी मी आता मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या मजबूत झाली आहे.'

Web Title: Actress Poonam Pandey Reveals Her Truth About Her Ex Husband Sam Lock Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top