
Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या लॉक अप नावाच्या रियॅलिटी शो मधून पुनम पांडे बाहेर पडली आहे. कंगना रनौतच्या या शो ला (Lock Upp) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर देखील त्याची खूप चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून लॉक अपनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून (Poonam Pandey) आले आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. ग्रँड सेलिब्रेशनला (Grand Finale) सुरुवात होण्यापूर्वीच त्यातून मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पुनम पांडे (Kangana Ranaut) बाहेर पडली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेय़र करुन यासंबंधी माहिती दिली आहे.
पुनम पांडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन आपण या शो मधून आऊट झाल्याचे चाहत्यांना सांगितलं आहे. कंगनाच्या या शो मध्ये ती पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिनं अनेकांशी पंगा घेऊन आपलं स्थान असुरक्षित केल्याचे नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. प्रेक्षकांकडून तिला कमी वोटिंग झाल्यानं घरचा रस्ता धरावा लागला आहे. 7 मे रोजी कंगनाच्या ल़ॉक अपचा फिनाले रंगणार आहे. ज्यावेळी हा शो सुरु झाला होता तेव्हा त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. तो शो चालणार की नाही त्याला प्रेक्षक मिळणार की नाही यावरुन नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती. अखेर त्याचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामध्ये कोण जिंकणार याची अनेकांना उत्सुकता आहे.
पुनमनं या शो मध्ये देखील आपल्या बोल्डनेसचं प्रदर्शन करुन कंगनाचा राग ओढावून घेतला होता. तिच्या अशाप्रकारच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. ज्यावेळी प्रेक्षकांकडून वोटिंग घेण्याची वेळ आली त्यामध्ये पुनमच्या वाट्याला सर्वात कमी वोटिंग आले. त्यामुळे तिला या शोमधून बाहेर पडावे लागले. पुनमच्या बाहेर जाण्यानं आता पायल रोहतगी, सायशा शिंदे, आजमा फल्लाह, अंजली अरोडा, मुनव्वर फारुखी, प्रिंस नरुला यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.