प्राची आणि नागा चैतन्यची जोडी करणार का धमाल ? लवकरच सोबत दिसणार या वेब सिरीजमधे

नागा चैतन्य आणि प्राची एका वेब सिरीजमधे प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
Acress Prachi Desai And Actor Naga Chaitanya will seen in web series soon
Acress Prachi Desai And Actor Naga Chaitanya will seen in web series soon esakal

साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य हा साऊथच्या बड्या अभिनेत्यांपैकी एक आहे.टॉलीवुडचे अनेक चित्रपट गाजवल्यानंतर आता हा अभिनेता त्याचे नशिब बॉलीवुडमधे आजमावण्याच्या तयारीत दिसतोय.(South Film)आमीर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून नागा चैतन्यची ही बॉलीवुड एन्ट्री असणार आहे.या दरम्यान आणखी एक मोठी बातमी पुढे येतेय.नागा चैतन्य आणि प्राची एका वेब सिरीजमधे प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

बॉलीवुड एन्ट्री बरोबरच मागोमाग वेब सिरीज करणार म्हटल्यावर अनेकांचा आवडता अभिनेता नागा चैतन्य डबल धमाका करणार की काय अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.नुकताच अभिनेत्री प्राची देसाईने नागा चैतन्यसोबतचा एक फोटो शेअर केलाय.हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना प्राची देसाईने कॅप्शनमधे सगळ्या टीमचे आभार मानत टीमला टॅग केले आहे.प्राची देसाई ही एक टेलिव्हीजन स्टार होती.तिने 'रॉक ऑन' या चित्रपटातूम बॉलीवुडमधे करियरला सुरूवात केली होती.यासोबतच तिने अभिनेता अजय देवगण आणि इनरान हाश्मी सोबत 'वन्स अपॉन अ टाईम ईन मुंबई' या चित्रपटात देखिल काम केले आहे.

अभिनेता नागा चैतन्य धूता नावाच्या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या वेब सिरीजमधे अभिनेत्री प्राची देसाई देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.प्राची आणि नागाला या वेब सिरीजमधे सोबत बघण्याासाठी चाहते आतुर आहेत.'मनम' आणि 'थँक यू' नंतर नागा चैतन्यचा दिग्दर्शक विक्रम के कुमार सोबत तिसरा प्रोजेक्ट असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com