कोण आहेत प्राजक्ता माळीचे तीन अध्यात्मिक गुरु? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress prajakta mali shared post about her three spirituals guru on guru paurnima

कोण आहेत प्राजक्ता माळीचे तीन अध्यात्मिक गुरु?

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त तिने एक खास पोस्ट शेयर करत आपल्या गुरूंविषयी लिहिले आहे.

(actress prajakta mali shared post about her three spirituals guru on guru paurnima)

हेही वाचा: लोक म्हणाले, मोहन जोशी आणि 'स्वामी समर्थ' अशक्य, पण शक्यही झालं आणि हीटही..

आज गुरुपौर्णिमे निमित्त प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्या गुरूंना वंदन करत आहेत. त्यांच्याविषयी समाज माध्यमांवर भरभरून लिहीत आहेत. यामध्ये मनोरंजन विश्वात कलाकारही आपल्या गुरूंविषयी भावना व्यक्त करत आहेत. अनेकांचे गुरु त्याच कार्यक्षेत्रातील आहेत तर काहींचे आध्यात्मिक गुरु आहे. अभिनेत्री प्राजक्ताने अशीच एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील तीन गुरुंविषयी लिहिले आहे. यामध्ये तिने तीन फोटो शेयर केले आहेत. पहिल्या फोटोत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी आहेत. तर दुसऱ्या फोटोत आध्यात्मिक गुरू ओशो आणि तिसऱ्या फोटोत भगवान गौतम बुद्ध दिसत आहेत. या फोटोला तिने अत्यंत भावनिक कॅप्शन दिले आहे.

(guru paurnima news marathi) (guru pornima)

प्राजक्ता म्हणते, 'माझे ३ अध्यात्मिक गुरु…१. 'श्री श्री रवी शंकरजी. ज्यांनी मला 'सुदर्शन क्रिया' आणि जगण्यात 'ध्यान' करण्याचा मार्ग दाखवला. २. ओशो, ज्यांनी 'ना भोगो ना त्यागो वरन जागो' हा क परम मंत्र दिला. ३. बुद्धा, ज्याने मला जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं. मला वाटतं, त्यांनी माझं मन आणि हृदयावर संस्कार करीन मला माझ्या जीवनाचे उद्दिष्ट दाखवले दिला.

पुढे ती म्हणते, 'कधी कधी आपलं जीवनाचं तत्वज्ञान सांगायला भिती वाटते… ते जाहीर केल्यावर तंतोतंत पाळायची जबाबदारी येते. आणि कधी कधी ते बदलतं देखील. (Coz change is the only constant thing.) पण माझा आत्ता ह्या क्षणी ह्यांच्यावर विश्वास आहे हे सांगायला हवं, अस मला वाटतं. आणि मी माणूस आहे. पुढे जाऊन मी चुकेन, हरवेन; पण एका माणसामुळे तुम्ही तुम्हांला पटलेल्या “ज्ञानावरचा” विश्वास गमावू नका. ज्ञानावर संशय घेऊ नका.

असो , भारतीय गुरू परंपरेतील सर्व गुरूंना, आई- वडील, माझ्या नृत्य आणि योग गुरूंना, शालेय- कॅालेज शिक्षकांना तसेच माझ्या नकळत ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांना माझा हा virtually साष्टांग दंडवत, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

Web Title: Actress Prajakta Mali Shared Post About Her Three Spirituals Guru On Guru Paurnima

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..