कोरोनावर मात केल्यानंतर प्रिया बापटचा खास मेसेज

priya bapat
priya bapat

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या चाहत्यांनी तेव्हा सोशल मिडीयावर त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. प्रिया आणि उमेशने एक खास लाईव्ह सेशन घेतले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्या दोघांनी ही कोरोनावर मात केली आहे. कोरोना झाल्यावर त्यांनी एकमेकांची काळजी कशी घेतली, तसेच त्यांनी कोणत्या प्रकारचा आहार घेतला हे लाईव्ह सेशनमध्ये सांगितले होतं. 

नुकतीच प्रियाने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये प्रियचा पोस्ट वर्कआऊट ग्लो दिसत आहे. वर्काऊटनंतरचे फोटो शेअर करून त्याला तिने कॅप्शन दिले की, ‘फायनली पुन्हा वर्कआऊट करायला सुरूवात केली आहे. करोनामधून रिकव्हर झाल्यानंतर मी फक्त घरात चालण्याचा व्यायाम करत आहे. मी सुरवात फक्त 20 मिनिटे चालून केली. पण मी आता 3 किलोमीटर जॅगिंग आणि वॉकिंग करत आहे. मी घरातच व्यायाम करत आहे. अजून मी घराबाहेर वर्काऊट करायला गेले नाही. घारात सूर्य़नमस्कार आणि चालण्याच्या माझ्या स्टॅमिनावर काम करत आहे. कोरोनाचा पोस्ट रिकव्हरी वर्कआऊट खूप महत्वाचा आसतो. तुम्हाला तुमच्या शरिराची गरज ओळखावी लागते. तुमच्या फिटनेस ट्रेनरचे आणि डॉक्टरांचे ऐका.’  

हे वाचा - मृण्मयी देशपांडेचा मुंबईला 'Good Bye'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

खास पोस्ट शेअर करून प्रियाने नेटकऱ्यांना फिटनेस मंत्रा दिला आहे. प्रिया सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. तिचे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर ती शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी प्रियाने साधी माणसं या चित्रपटातील ऐरणीच्या देवा हे गाणे म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्याला तिने, ‘गो करोना गो असे’ कॅप्शन दिले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

काही दिवसांपूर्वी प्रिया आणि उमेशने एका वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न केलं. त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सिरीजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com