
मुंबई ः अभिनेत्री प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाची यशस्वी इनिंग खेळतानाच तिने स्वतःचे प्राॅडक्शन हाऊस काढले आणि चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर तिने आपला सुखाचा संसार थाटला आणि तरीही ती चित्रपटसृष्टीत तितकीच बिझी आहे. आता तिची जगात अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतातील नायिकांमध्ये तिची तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यपचीदेखील निवड करण्यात आली आहे. अन्य कलाकारांमध्ये हाॅलीवूडच्या नावांचा समावेश आहे.
दरवर्षी टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. जगातील दर्जेदार आणि आशयघन चित्रपट या महोत्सवात दाखविले जातात. यावर्षी हा चित्रपट महोत्सव 10 ते 20 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. चित्रपटाच्या एन्ट्री आॅनलाईन मागविण्यात आल्या आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व प्रियांका चोप्रा करणार आहे. याबाबत प्रियांका म्हणाली, की मला खूप आनंद झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक चांगले प्रमोट करण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.