देसी गर्ल प्रियंका चोप्राचा 'भारत'ला बाय बाय! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा 'भारत' हा नवीन सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांना प्रमुख भुमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. पण प्रियंकाने सिनेमातून एक्झिट केली आहे.

मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्राने जेव्हापासून कामासाठी विदेश गाठले तेव्हापासून भारतातील तिचे चित्रपट कमी झाले आहे. परदेशात रमताना ती दिसत असते. केवळ कामच काय तर आयुष्याचा जोडीदारही प्रियंकाने परदेशातला शोधला आहे. सध्या लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकाने 'भारत' सोडल्याचेही कळते आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा 'भारत' हा नवीन सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांना प्रमुख भुमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. पण प्रियंकाने सिनेमातून एक्झिट केली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विटरवरुन प्रियंकाची सिनेमातून एक्झिट बाबत बातमी सांगितली आहे. 'प्रियंका 'भारत' सिनेमाचा भाग नसेल आणि त्याचं कारण खुप खास आहे. तिने ऐनवेळी आपला निर्णय कळवला आहे आणि आम्ही सगळे तिच्यासाठी आनंदी आहोत. प्रियंकाला 'भारत'च्या टीमकडून भावी आयुष्यासाठी खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा.' असे ट्विट जफर यांनी केले आहे. 
 

अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनस याच्याशी सुत जुळल्यानंतर प्रियंका आणि निक च्या प्रेमाच्या चर्चा जगभर सुरु आहेत. 'ऐनवेळी' या शब्दाऐवजी जफर यांनी ट्विटमध्ये 'निक ऑफ टाईम' हा शब्द प्रयोग केला आहे. 

गेल्या महिन्यात प्रियंका आणि निक भारतात आले होते. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांचं लग्नं होईल अशीही चर्चा आहे. मात्र ऐनवेळी प्रियंकाने 'भारत'ला सोडचिठ्ठी देण्याचे कारण निक असावे असाच कयास लावला जात आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. 
  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Priyanka Chopra Says Goodbye To Bharat Movie