सुष्मिता सेनच्या बाजूने उतरल्या 'या' दोघी...कोणावर शिंतोडे उडवणे चुकीचे | Sushmita Sen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushmita sen

सुष्मिता सेनच्या बाजूने उतरल्या 'या' दोघी...कोणावर शिंतोडे उडवणे चुकीचे

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशीपवरुन सध्या मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद होताना दिसत आहे. ती गोल्डन डिग्गर असल्याचा आरोप केला जात आहे. इंग्लंडमध्ये राहत असलेल्या ललित मोदी याने स्वतःहून सुष्मिता आणि त्याच्या नात्याविषयी माहिती दिली होती. तसेच त्याने तिला बेटर हाफ म्हणूनही संबोधले होते. वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर सुष्मिता सेननेही (Sushmita Sen) आपले म्हणणे मांडले होते. (Actress Pooja Bedi And Somi Ali Support Sushmita Sen)

हेही वाचा: हाॅलीवूड अभिनेत्री रणबीर कपूरवर रागवली होती, कारण...

अद्यापही विवाहबंधनात अडकलेली नाही. सध्या सिंगल असून आपल्या दोन मुलींसह राहत असल्याचे तिने सांगितले. यावर तिच्या काही एकेकाळच्या प्रियकरांनीही प्रतिक्रिया दिल्या. सुष्मिता सेनने हे केवळ पैशासाठी केल्याचा आरोपही काहींना केला होता. एका मुलाखतीत पूजा बेदी आणि सोमी अली या दोन्ही अभिनेत्रींनी सुष्मिताला (Bollywood News) पाठिंबा दिला.

हेही वाचा: हाॅलीवूडच्या रुसो ब्रदर्ससाठी मुंबईत पार्टी; आर्यन, शाहीदसह अनेकांची हजेरी

मी तिला पूर्वीपासून ओळखत असून आमचे चांगले संबंध आहेत. तिने आजपर्यंत जे काही मिळवले आहे, ते स्वतःच्या जिद्दीवर मिळविले आहे, असे अभिनेत्री सोमी अलीने (Somi Ali) सांगितले. दुसरी अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) म्हणाली, कोणावर शिंतोडे उडवणे हे चुकीचे आहे.

Web Title: Actress Puja Bedi And Somi Ali Support Sushmita Sen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top