हाॅलीवूडच्या रुसो ब्रदर्ससाठी मुंबईत पार्टी; आर्यन, शाहीदसह अनेकांची हजेरी

रुसो ब्रदर्स सध्या भारतात त्यांचा चित्रपट 'द ग्रे मॅन'च्या प्रमोशनसाठी आले आहेत.
Russo Brothers
Russo Brothers esakal

रुसो ब्रदर्स सध्या भारतात त्यांचा चित्रपट 'द ग्रे मॅन'च्या (The Gray Man) प्रमोशनसाठी आले आहेत. यात तमिळ सुपरस्टार धनुषचीही (Dhanush) भूमिका आहे. रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांनी रुसो ब्रदर्ससाठी मुंबईत आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan), अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सारा अली खान, शाहीत कपूर, अनन्या पांडे, रविना टंडन, गौरी खान यांच्यासह इतर बाॅलीवूड कलाकारांनी हजेरी लावली. रुसो ब्रदर्सचा (Russo Brothers) 'द ग्रे मॅन' या चित्रपटाचा २२ जुलै रोजी ऑनलाईन प्रिमियर करण्यात आले. चित्रपटाचे स्क्रिनिंग बुधवारी रात्री मुंबईत (Mumbai) पार पडले. (Ritesh sidhwani's Party For Russo Brothers In Mumbai, Aryan Khan, Shahid Kapoor Many Bollywood Stars Present)

Russo Brothers
Sayali Sanjeev : सायली संजीवने सांगितला फिटनेस फंडा

धनुषने 'द ग्रे मॅन' या चित्रपटामधून हाॅलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. अॅव्हेंजर्सचे प्रसिद्ध दिग्दर्शकाची जोडी रुसो ब्रदर्सने हा चित्रपट बनवला आहे. हा नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा साहसपट आहे. (Bollywood News)

Russo Brothers
Ranveer singh :अखेर दीपिका बोलली ! नवऱ्याच्या न्यूड फोटोशूटवर दिली प्रतिक्रिया

धनुषबरोबर हे कलाकारही चित्रपटात

या चित्रपटात हाॅलीवूड स्टार रायन गाॅस्लिंग, क्रिस इव्हान्स, आना दे अर्मास आणि रेगे जाॅन पेज यांच्या बरोबर धनुषही अभिनय करताना दिसणार आहे. आतापर्यंत चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी अभिनेता धनुषच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com