स्वतःच्याच लग्नात नवऱ्यासोबत फोटो काढायला विसरली राधिका आपटे,कारण ऐकाल तर.. Radhika Apte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Radhika Apte forgot to be photographed in her own wedding,

स्वतःच्याच लग्नात नवऱ्यासोबत फोटो काढायला विसरली राधिका आपटे,कारण ऐकाल तर..

आपल्या लग्नाविषयी प्रत्येक जण खूप उत्सुक पहायला मिळतो. असं म्हणतात,लग्न फक्त आयुष्यात एकदाच होतं. त्यादिवशीचा प्रत्येक क्षण ज्याला त्याला कॅमेऱ्यात कैद करायचा असतो. अगदी हौसेने सगळं त्या दिवशी केलं जातं. याला अर्थातच बॉलीवूडही(Bollywood) अपवाद नाही. गेल्या काही दिवसांत बड्या सेलिब्रिटींचा लग्नसोहळा आपण फोटोजच्या माध्यमातूनच अनुभवला असेल नाही का. दीपिका,कतरिनापासून ते अगदी आलिया भट्ट पर्यंत साऱ्याच लग्नात आपल्या लूक आणि पोजेसला घेऊन खूप पर्टिक्युलर दिसल्या. पण बॉलीवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या लग्नाला एकदम हटके पद्धतीनं सेलिब्रेट केलं. राधिका आपटे (Radhika Apte) असं या अभिनेत्रीचं नाव आहे,जिने एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा मजेदार किस्सा शेअर केला आहे.(Actress Radhika Apte forgot to be photographed in her own wedding)

हेही वाचा: Laal Singh Chaddha: पेनकिलर्स खाऊन आमिरनं अख्खा सीक्वेन्स शूट केला,कारण...

राधिका आपटेने मीडियाला दिलेल्या वृत्तानुसार आपल्या लग्नाचे काही असे किस्से ऐकवले जे ऐकून आपण सगळेच हैराण व्हाल. पण यामागे एक कारण आहे,जे जास्त थक्क करुन सोडणारं आहे. तिनं सांगितलं की लग्नात आलेले तिचे जास्तीत जास्त मित्र हे फोटोग्राफर होते. पण ते सगळेच मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे ती आपल्याच लग्नात फोटो काढायला विसरली.

राधिका आपटेनं आपल्या लग्नाविषयी खुलासा करत सांगितलं की,''जेव्हा मी १० वर्षापूर्वी बेनेडिक्टसोबत लग्न केलं होतं,तेव्हा आम्ही लग्नाचे फोटो काढायलाच विसरलो. माझ्या लग्नात माझे जे मित्र आले होते,त्यांनी स्वतः जेवण बनवलं होतं. तिचं लग्न नॉर्थ इंग्लंडमध्ये झालं जिथे तिने लग्नाची पार्टी दिली,पण फोटो काढायला ती विसरली. राधिक पुढे म्हणाली,आम्ही सगळेच मद्यधुंद अवस्थेत होतो. त्यामुळे माझ्याकडे आमच्या लग्नाचा एकही फोटो आठवणीसाठी सुद्धा नाही. तिनं विनोदानं म्हटलं की,एकाअर्थे बरंच झालं कारण माझ्या नवरा फोटोसाठी पोज देण्यात खूपच वाईट आहे''.

हेही वाचा: वयाच्या ८० व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचे गुजराती सिनेमात पदार्पण

राधिकाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर ती आपल्या नवऱ्यासोबत राहत नाही. कामाच्या निमित्तानं तिला अनेकदा मुंबईत यावं लागतं. तिचा नवरा त्याच्या प्रोफेशनमुळे लंडनमध्ये राहतो. राधिकाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर राधिका आपटे खूप उत्तम अभिनेत्री आहे. नुकतीच ती विक्रांत मैसीसोबत एका वेबसिरीजमध्ये दिसली होती. लवकरच तिचा 'विक्रम वेधा' सिनेमाही प्रदर्शित होणार आहे, यामध्ये हृतिक रोशन,सैफ अली खान असे कलाकार दिसणार आहेत.

Web Title: Actress Radhika Apte Forgot To Be Photographed In Her Own

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..