esakal | धबधब्याखाली राधिकाचं 'ध्यान'; 'दंगल गर्ल'नं दिली कमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

धबधब्याखाली राधिकाचं 'ध्यान'; 'दंगल गर्ल'नं दिली कमेंट

धबधब्याखाली राधिकाचं 'ध्यान'; 'दंगल गर्ल'नं दिली कमेंट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन entertainment क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी लोकप्रियता आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठ काय करतील याचा भरवसा नाही. सध्या एका अभिनेत्रीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं जे काही केलं आहे त्याची चर्चा आहे. यापूर्वी कित्येक सेलिब्रेटींनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी देखील त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातून बॉलीवूडमध्ये जाणाऱ्या अभिनेत्री राधिका मदानचा radhika madan एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा social media trending विषय आहे. त्यात ती एका धबधब्याखाली ध्यानाला बसल्याचे दिसून आले आहे. तिच्या त्या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत.

राधिका त्या व्हिडिओमध्ये एका धबधब्याखाली बसली आहे. तिथे ती ध्यानाला बसल्याचे दिसते आहे. तो व्हिडिओ महाराष्ट्रातील शिळीम येथील आहे. राधिकाच्या त्या व्हिडिओला आतापर्यत अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. तिला चाहत्यांनी काळजी घेण्यास सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राधिका चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या त्या फोटोंवर प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रानंही कमेंट केली आहे. तिनं लिहिलं आहे की, हर हर महादेव, याप्रकारच्या व्हिडिओमुळे राधिकानं आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिल्लीतील पीतमपुरा भागातून आलेल्या राधिकानं आता बॉलीवू़डमध्ये मोठे प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ वर्षीय राधिकानं २०१४ मध्ये टीव्ही सीरियल मेरी आशिकी तुम से ही मध्ये दिसली होती. त्यात तिनं ईशानी पारिखची भूमिका केली होती. २०१५ मध्ये तिनं विशाल भारद्वाज यांच्या पटाखा नावाच्या चित्रपटामध्ये दिसली होती. राधिका ही दिवंगत अभिनेता इरफान खानच्या अंग्रेजी मीडियममध्येही दिसली होती. तिचा आगामी चित्रपट कुत्ते हा असणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

loading image
go to top