Rakhi Sawant Brother Arrested: राखी सावंत हिच्या भावाला अटक! 'ते' प्रकरण आले अंगाशी

ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Rakhi Sawant, Rakhi Sawant news, Rakhi Sawant brother arrested, rakesh sawant arrested, mumbai police
Rakhi Sawant, Rakhi Sawant news, Rakhi Sawant brother arrested, rakesh sawant arrested, mumbai policeSAKAL

Rakhi Sawant Brother Arrested News: चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश अनंत सावंत यास ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे.

तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेशला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.

(actress rakhi sawant brother rakesh sawant arrested by mumbai Oshiwara police due to check bounce case)

मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट काढले. यानंतर रविवारी ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Rakhi Sawant, Rakhi Sawant news, Rakhi Sawant brother arrested, rakesh sawant arrested, mumbai police
Kedar Shinde Love Story: दादरचं इराणी हॉटेल, बन - मस्का आणि १ एप्रिल.. अशी आहे केदार - बेलाची लव्हस्टोरी

राखी सावंत सतत चर्चेत असते हे आपल्याला माहीतच आहे. आता राखी सावंतच्या भावाच्या अंगाशी सुद्धा ते जुनं प्रकरण आलं आहे. आता या प्रकरणी राखी सावंत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय राखी तिच्या भावाला पोलीस कोठडीतून सोडवणार का, हे पाहणं सुद्धा कुतूहलाचा विषय आहे. दरम्यान राखी सावंतची यावर अजून कोणतीही कल्पना आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com