Rakhi Sawant Video:"कोणाच्याही प्रेमात..."; वेदनेने किंचाळत राखी सावंतने पुसला टॅटू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Rakhi Sawant's Video viral on social media,she removed Ritesh named tattoo from her body

"कोणाच्याही प्रेमात..."; वेदनेने किंचाळत राखी सावंतने पुसला टॅटू

सोशल मीडिया अटेंशन घेणारी राखी सावंत कायम चर्चेत असतेच यात काही वाद नाही.कधी तीच्या विचित्र वागण्याचे तर कधी तीचे कोणासाठी बाजू घेत भांडण्याचे तीचे व्हिडिओ वायरल होतच असतात.राखी सावंत उघडपणे कुठल्याही विषयावर बोलणे पसंत करते त्यामुळे तीचे जेवढे फॅन्स आहेत तेवढेच तीचे विरोधकही आहे.यावेळी मात्र तीच्या सोशल मीडियावरचा जो व्हिडिओ वायरल होतोय तो बघून प्रेक्षकही चकीत झाले आहेत.

राखीने तीच्या पती रितेशच्या नावाने एक टॅटू तीच्या कमरेच्या वरच्या दिशेने काढला होता.त्या टॅटूला काढण्यासाठी आता ती टॅटू पार्लरमधे परत गेलेली दिसते.हा टॅटू पुसताना तीला ज्या वेदना झाल्या त्या तीच्या व्हिडिओमधून झळकत आहेत.(Rakhi Sawant)'तीन साल शादी के'...म्हणत लग्न केल्याचा पचतावा तीच्या बोलण्यातून दिसत होता.हा टॅटू पुसताना ती प्रचंड किंचाळताना दिसतेय.हा व्हिडिओ तीच्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालेला दिसतो.एकाने तीच्या या व्हिडिओवर 'तू स्वत:च इतकी स्ट्राँग आहेस की तुला कोणाची गरज नाही तर दुसऱ्याने 'टॅटू का पुसतेय' असे विचारले आहे.एकाने यानंतर 'परत टॅटू काढू नकोस' असे देखिल म्हटले आहे.

नेमकी किंचाळताना काय म्हणाली राखी

राखीला टॅटू पुसताना वेदना होत होत्या. "लग्नाचे तीन वर्ष...रितेश तू माझ्या जीवनातून आणि शरीरातूनही आज कायमचा निघाला आहेस.जीवनात प्रेमात वेडं होऊन कधी टॅटू काढू नये तो पुसताना मग फार त्रास होतो."असे बोल तीच्या या व्हिडिओमधे ऐकायला मिळतील.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामधे चांगलाच चर्चेत आहे.

या वर्षीच राखी सावंत आणि रितेशने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.त्याबाबची एक पोस्टही तीने सोशल मीडियावर शेअर केली होती.राखी सावंतने या पोस्टमधे एकमेकांपासून वेगळे होण्याचे दु:ख व्यक्त केले होते.तसेच वॅलेंटाईनच्या आधीच ही वाईट बातमी दिल्याबाबतची एक पोस्ट शेअर करत तीने मला स्वत:वर आणखी फोकस करायचे आहे आणि हेल्दी राहायचे आहे असे लिहिले होते.

Web Title: Actress Rakhi Sawant Removed Ritesh Named Tatto From Her Body Video Viral On Social

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top